Sangli DCC Bank : सांगली जिल्हा बँक चौकशीचा गोंधळ सुरूच

चौकशीस स्थगितीसाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या असताना सहकार विभागाने पाठविलेल्या पत्रामुळे पुन्हा गोंधळ निर्माण झाला आहे.
District Bank
District BankAgrowon
Published on
Updated on

Sangli District Bank News : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Cooperative Bank) गैरव्यवहाराच्या तक्रारीची दोन महिन्यांपासून सहकार विभागाच्या पथकाकडून चौकशी सुरू होती. पथकाने बँक अधिकाऱ्यांकडील कागदपत्रांची तपासणी अंतिम टप्प्यात आणली होती.

मात्र गत आठवड्यात सहकार विभागाच्या तोंडी सूचनेने चौकशी थांबविण्यात आली. चौकशी थांबली असताना सहकार विभागाने (Cooperative Department) अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश चौकशी पथकाला दिले.

चौकशीस स्थगितीसाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या असताना सहकार विभागाने पाठविलेल्या पत्रामुळे पुन्हा गोंधळ निर्माण झाला आहे.

जिल्हा बँकेतील कारभाराबाबत स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी सहकार आयुक्त कार्यालयाकडे तक्रार केली होती. याप्रकरणी चौकशीचे आदेश यापूर्वी दिले होते. परंतु चौकशीला २३ सप्टेंबर २०२१ रोजी महाविकास आघाडी सरकारकडून स्थगिती देण्यात आली होती.

District Bank
Sangli DCC Bank : सांगली जिल्हा बँक कारभाराची चौकशी सुरू

अडीच महिन्यांपूर्वी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सहकारमंत्र्यांकडे बँकेच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर चौकशीचे आदेश देऊन समिती नियुक्त करण्यात आली आहे.

विभागीय सहनिबंधक डी. टी. छत्रीकर यांच्या अध्यक्षतेखालील पथकात विशेष लेखापरीक्षक शीतल चोथे, संजय पाटील, अनिल पैलवान, द्वितीय अपर लेखापरीक्षक रघुनाथ भोसले यांचा समावेश आहे.

बँकेकडून ‘सरफेसी’ कायद्यांतर्गत कर्जदार संस्थांची मालमत्ता विक्री, संस्था, कंपनी व महिला बचत गटाचे ६० कोटींचे कर्ज निर्लेखित करणे, तत्कालीन संचालकांच्या कारखान्यास ३२ कोटींचे कर्ज शिफारस नसताना देणे, स्वप्नपूर्ती शुगर्स कारखान्यास चुकीच्या पद्धतीने २३ कोटी रुपये कर्जवाटप, २१ तांत्रिक पदांची बनावट कागदपत्रांच्या आधारे भरती आदींबाबत तक्रार होती. या प्रकरणांची चौकशी समितीकडून सुरू होती.

District Bank
Zilha Bank : तोंडी आदेशाने जिल्हा बँकेची चौकशी थांबली

पथकाने तक्रारीनुसार बँकेकडून माहिती घेऊन कागदपत्रांची मागणी केली होती. चौकशी अहवाल पूरक कागदपत्रांसह २८ फेब्रुवारीपर्यंत सादर करण्यात येणार होता.

मात्र चौकशी अचानक थांबली होती. पथक गेले दहा दिवस बँकेत फिरकले नव्हते. त्यामुळे फराटे यांनी चौकशी अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com