Akola News : ‘सात-बारा कोरा करू, शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सोडवू’ अशी ग्वाही निवडणुकीत देणाऱ्या सरकारकडून आश्वासने पाळली जात नसल्याच्या निषेधार्थ मूर्तिजापुरात शुक्रवारी (ता. २२) क्रांतिकारी शेतकरी संघटनेने लक्षवेधी ‘काळा’ बैलपोळा आंदोलन केले. तहसील कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते..कर्जमाफी, ओला दुष्काळ मदत, पीकविमा, शेतीमालाला भाव या मागण्यांकडे सरकारने डोळेझाक केली असल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. आंदोलनाच्या सुरुवातीला काळ्या झुलांनी सजविलेल्या बैलांच्या मिरवणुकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या घोषणा देण्यात आल्या. .Farmers Protest: भाकड पशुधनप्रश्नी आंदोलन करणार.तहसील कार्यालयासमोर प्रचंड घोषणाबाजी करीत शेतकऱ्यांनी शासनाविरोधात रोष व्यक्त केला. संघटनेचे संस्याथापक रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनात या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी यांनी केले. .जिल्हा संघटक राहुल वानखेडे, उपाध्यक्ष संजय सोनोने, तालुकाध्यक्ष शुभम जवजाळ, सैय्यद रियाज, प्रवीण खोत, रामदास भगत, सचिन जिथे, नितीन तायडे, रमेश चिंचे, आदित्य बाहे, दिनकर मानकर यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते..Farmers Protest: विदेशी गोवंश, वन्यप्राणी जीव संरक्षण कायदा रद्द करा.शेतकऱ्यांच्या मागण्यासरसकट व पूर्ण कर्जमाफीओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार मदतरद्द केलेले पीकविमा नियम रब्बी २०२५ पर्यंत पूर्ववत करणे२०२२-२४ चा थकित पीकविमा तत्काळ खात्यात जमा करणेकापूस व तुरीला १० हजार प्रति क्विंटल भावसोयाबीन व हरभऱ्याला ८ हजार प्रति क्विंटल भाव.सरकारच्या शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये. आज जिल्ह्यातील शेतकरी हा मोठ्या अडचणीतून जात आहे. सततच्या पावसाने यंदाच्या खरीप हंगामाचे अतोनात नुकसान केले. त्याच पीकविमा मिळालेला नाही. शेतीमालाचे दर घसरले आहेत. शेतकऱ्यांचा संयम आता सुटू लागला आहे. शासनाने तातडीने या मागण्यांची दखल घेतली नाही तर आणखी उद्रेक वाढू शकतो.- चंद्रशेखर गवळी, जिल्हाध्यक्ष, क्रांतिकारी शेतकरी संघटना.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.