Dr. Vijaykumar Gavit : राज्यात नंदुरबार जिल्ह्याचा आदर्श निर्माण करणार

Government Scheme : दोन वर्षांत केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यांला होण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत.
Dr. Vijaykumar Gavit
Dr. Vijaykumar GavitAgrowon
Published on
Updated on

Nandurbar News : स्वातंत्र्यापासून आजपर्यंत देशाच्या व राज्याच्या सर्व महत्त्वाकांक्षी योजनांचा पथदर्शी जिल्हा म्हणून नंदुरबारची ओळख आहे, तसेच कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीत नंदुरबार जिल्ह्याचा आदर्श राज्यासाठी निर्माण करू, असे आदिवासी विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.

ते नवापूर येथे शबरी घरकुल योजनेच्या आदेश वाटप कार्यक्रमात शनिवारी (ता. २) बोलत होते. खासदार डॉ. हीना गावित, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती संगीता गावित, पंचायत समिती सभापती बबिता वसावे, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार, गटविकास अधिकारी डी. एम. देवरे आदींसह विविध यंत्रणांचे अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

Dr. Vijaykumar Gavit
Nandurbar Water Crisis : टंचाईस्थिती निर्माण झाल्यास पेयजलास प्राधान्य

पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, की दोन वर्षांत केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यांला होण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. एकही नागरिक शासकीय योजनांपासून वंचित राहणार नाही.

Dr. Vijaykumar Gavit
Nandurbar Water : नंदुरबारातील प्रकल्पांत ठणठणाट

स्वच्छ पाणी, चकचकीत रस्ते, स्वमालकिचे घर, दर्जेदार शिक्षण, रोजगाराभिमुख कौशल्यावर आधारित शिक्षण, शंभर टक्के शेती सिंचनाखाली आणतानाच प्रत्येकाला सर्व शासकीय योजनांचा लाभ, सोयी-सुविधा देण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू असून, येणाऱ्या काळात राज्यातील विकासात आघाडीवर असलेल्या प्रथम तीन जिल्ह्यात नंदुरबार जिल्हा असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

खासदार डॉ. हीना गावित यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची एक लोककल्याणकारी, समृद्ध व सामर्थ्यवान राष्ट्र अशी प्रतिमा जगासमोर निर्माण झाली आहे, अशीच समृद्ध, सामर्थ्यवान प्रतिमा आपल्या जिल्ह्याची भविष्यात निर्माण करू, असे सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com