Food Adulteration  Agrowon
ॲग्रो विशेष

Adulteration Detection Test : गोड पदार्थातील भेसळ ओळखण्याची चाचणी

Article by Rameshwar Jaju : बाजारात साखर, गूळ, मध, मिठाई असे विविध गोडवा आणणारे घटक उपलब्ध आहेत. परंतु यामध्ये काही वेळा आपणाला भेसळ आढळते. भेसळयुक्त गोड पदार्थात रसायने मिसळल्याची शक्यता असते.

Team Agrowon

डॉ. रामेश्‍वर जाजू

Adulteration : बाजारात साखर, गूळ, मध, मिठाई असे विविध गोडवा आणणारे घटक उपलब्ध आहेत. परंतु यामध्ये काही वेळा आपणाला भेसळ आढळते. भेसळयुक्त गोड पदार्थात रसायने मिसळल्याची शक्यता असते. यामुळे शरीराला अपायकारक विकार होतात. हे लक्षात घेता भेसळयुक्त आहारापासून सावध राहावे.

चांगल्या प्रतीच्या अन्नधान्य आणि इतर मालाची गुणवत्ता कमी करणे म्हणजेच भेसळ. विक्री करावयाचा कोणताही उत्तम प्रतीचा माल (त्यात इतर पदार्थ मिसळून, किंवा त्यातील कार्यकारी घटक काढून) तो कनिष्ठ प्रतीचा करून तो चांगल्या प्रतीचाच असल्याचे दर्शविणे, यास भेसळ करणे असे म्हणतात. अशी भेसळ करण्यामागे जास्तीचा अधिक नफा मिळविणे हाच प्रमुख हेतू असतो.

दैनंदिन जीवनात आहारातील विविध अन्न पदार्थांना गोडवा देण्यासाठी सर्वांत उपयुक्त घटक म्हणजे साखर. बाजारात साखर, गूळ, मध असे विविध गोडवा आणणारे घटक उपलब्ध आहेत. परंतु या सर्वांमध्ये आपणाला भेसळ आढळते. भेसळयुक्त गोड पदार्थात रसायने मिसळल्याची शक्यता असते.

यामुळे शरीराला अपायकारक विकार जसे की, यकृताचे विकार, पोटदुखी, अन्नातून विषबाधा, उलट्या, डोकेदुखी, मळमळ उद्‍भवू शकतात. त्यामुळे आपणाला वेळीच भेसळ ओळखता आली पाहिजे. जेणेकरून आपले शरीर स्वस्थ राहील. सामान्यपणे गोडवा आणणाऱ्या पदार्थात खडू पावडर, धुण्याचा सोडा, पिवळा रंग, युरिया, पांढरी वाळू, दगड, मेटॅनिल अशा विविध घटकांची भेसळ केली जाते.

साखर

खडू पावडर, चुऱ्याची भेसळ

खडू पावडरचा वापर साखरेचे वजन वाढविण्यासाठी आणि साखरेला चकाकी मिळवून देण्यासाठी भेसळयुक्त घटक म्हणून केला जातो.

भेसळ तपासणीसाठी थोडी साखर घेऊन ती एका काचेच्या ग्लासमध्ये विरघळण्यास ठेवावी. त्यात भेसळ नसेल तर शुद्ध साखर आपणाला दिसेल. परंतु खडू पावडरची भेसळ असल्यास साखर पाण्यात विरघळेल आणि खडूच्या चुऱ्याचा थर तळाशी दिसेल.

या भेसळयुक्त साखरेच्या दीर्घकालीन वापराने श्‍वसनाचे विकार होतात.

पिवळसर रंगाची भेसळ

साखरेचे द्रावण तयार करून त्यामधील ५ मिलि द्रावण टेस्ट ट्यूबमध्ये घ्यावे. त्यात हायड्रोक्लोरिक आम्लाचे काही थेंब टाकावे. तयार मिश्रणाला गुलाबी रंग आला असता भेसळ आहे असे समजावे.

धुण्याच्या सोड्याची भेसळ

भेसळ जाणून घेण्यासाठी एका टेस्ट ट्यूबमध्ये थोडी साखर घेऊन त्यावर चार थेंब हायड्रोक्लोरिक आम्ल टाकावे. जर लगेच बुडबुडे आल्यास त्यामध्ये धुण्याच्या सोड्याची भेसळ आहे हे ओळखता येते.

सॅकरिन भेसळ

सॅकरिन ही एक प्रकारची कृत्रिम साखर आहे. साखरेमध्ये सॅकरिनच्या पाण्याचा वापर केला असेल तर जिभेवर थोडा वेळ गोडपणा जाणवतो, परंतु शेवटी जिभेवर कडवटपणाची चव येते.

कडवट चव आल्यास भेसळ आहे असे समजावे.

गूळ

धुण्याच्या सोड्याची भेसळ

थोडा गूळ घेऊन त्यावर चार थेंब हायड्रोक्लोरिक आम्ल टाकावे. जर लगेच बुडबुडे आल्यास त्यामध्ये धुण्याच्या सोड्याची भेसळ आहे हे ओळखता येते.

झिंक फॉर्मलडीहाइडची भेसळ

गुळाला उचित रंगाचा मुलामा देण्यासाठी गंधकयुक्त झिंक फॉर्मलडीहाइड या रसायनाचा उपयोग केला जातो. याचे शरीरावर अपायकारक परिणाम होऊ शकतात.

हायड्रोक्लोरिक आम्लाचा वापर करून भेसळ ओळखता येते.

मेटॅनिलची भेसळ

गुळाचा खप वाढवण्यासाठी त्यामध्ये मेटॅनिल या पिवळसर रंगाचा वापर केला जातो.

हे ओळखण्यासाठी एका टेस्ट ट्यूबमध्ये थोडासा गूळ घेऊन २ ते ५ मिलि अल्कोहोल टाकावे. हे मिश्रण तयार झाल्यावर त्यात

८-१० थेंब हायड्रोक्लोरिक आम्ल टाकावे.

मिश्रणाला गुलाबी रंग आला, तर त्यामध्ये मेटॅनिल हा पिवळसर रंग असल्याची खात्री होते.

मध

गुळाच्या पाण्याची भेसळ

कापसाची वात मधात भिजवून ती पेटवली असता जर वात तडतडली तर त्यात भेसळ आहे असे समजावे.

जर वाट तेवत राहिली तर मध शुद्ध प्रतीचा आहे हे ओळखता येते.

पेपर चाचणी

मधाचे काही थेंब कागदावर टाकावेत आणि तो तसाच काही वेळ राहू द्यावा.

मधाची गुणवत्ता चांगली असेल तर कागद भिजणार नाही कारण मधात पाण्याचा अंश अतिशय कमी

असतो. पण भेसळ असेल तर कागद भिजेल.

मिठाईतील भेसळ

ॲल्युमिनिअम वर्ख

विविध प्रकारच्या मिठाईची पॅकिंग करण्यासाठी चांदीच्या खर्चिक वर्खाऐवजी ॲल्युमिनिअमचा वर्ख मोठ्या प्रमाणावर वापरतात.

हे तपासण्यासाठी वर्ख वेगळा करून मंद आचेवर ठेवावे. वर्ख चांदीचा असेल तर त्याचा बारीक असा गोळा बनतो. पण तो ॲल्युमिनिअमचा असेल तर तो लागलीच जळून त्याची राख बनते.

मधामध्ये साखरेची भेसळ

एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये मधाचे काही

थेंब टाकावे. जर मध शुद्ध असेल तर पाण्यात

विखुरला जात नाही. जर मध विखुरला गेले तर त्यामध्ये साखरेची भेसळ आहे असे समजावे.

डॉ. रामेश्‍वर जाजू, ९४२०४२२९८९

(सहायक प्राध्यापक, अन्न व्यवसाय व्यवस्थापन विभाग, एम.जी.एम. अन्नतंत्र महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT