Pune News: कालवा सल्लागार समितीची बैठक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आचारसंहितेमुळे लांबणीवर पडली आहे. यामुळे पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांमधील सात तालुक्यांतील शेतकऱ्यांना रब्बी पिकाच्या लागवड नियोजनाबाबत निर्णय घेण्यात अडचण निर्माण झाली आहे. .जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखेपाटील यांच्या अध्यक्षतेखाली रब्बी हंगामाच्या नियोजनासाठी ही बैठक नोव्हेंबरच्या सुरूवातीसच होणे अपेक्षित होते. त्यानुसार ६ नोव्हेंबर रोजी ही बैठक घेण्याचे ठरले होते. परंतु, ती अचानक रद्द करण्यात आली..Canal Lining : कालव्याच्या अस्तरीकरणाला विरोध.आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या धामधुमीत आचारसंहिता लागल्यामुळे ही बैठक आणखी लांबणीवर पडली आहे. परिणामी, रब्बी पिकांच्या नियोजनाबाबत अडचणी निर्माण झाल्याने याबाबत कुकडी पाटबंधारे विभागाने कालव्यात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे प्रशासकीय पातळीवर नियोजन जाहीर करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे..कुकडी प्रकल्पाअंतर्गत येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगे, डिंभे या पाच धरणांचा समावेश होतो. या धरणांना जोडलेल्या कालव्यांद्वारे जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर, कर्जत, करमाळा, श्रीगोंदा या सात तालुक्यांतील सुमारे ८० हजार हेक्टर क्षेत्रातील रब्बी हंगामातील पिकांना सिंचन केले जाते..Cabinet Meeting Boycot: शिंदे गटाच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार.या भागात रब्बी हंगामात प्रामुख्याने ऊस, कांदा, गहू, ज्वारी या प्रमुख पिकांसह इतर भाजीपाला पिके घेतली जातात. सद्यस्थितीत कांदा, ऊस, ज्वारी, गहू या पिकांची पेरणी सुरू आहे. कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी सद्यस्थितीत पाण्याची गरज आहे. डिसेंबर महिन्यात ३५ ते ४० दिवसाचे रब्बीचे आवर्तन सुरू केले जाते..धरणनिहाय आज अखेरचा उपयुक्त पाणी साठा टीएमसी (कंसात टक्के ): येडगाव: १.९४३ टीएमसी (१००टक्के), माणिकडोह:८.४८३ टीएमसी (८३.३४ टक्के), वडज: १.१७१ टीएमसी(९९.८७टक्के), पिंपळगाव जोगे: ३.६१३ टीएमसी(९२.८६ टक्के), डिंभे: १२.५०० टीएमसी( १०० टक्के), चिल्हेवाडी:०.७८२(९७.५२ टक्के)..‘‘आचारसंहितेमुळे कालवा सल्लागार समितीची नियोजित बैठक रद्द झाली. यावर्षी कुकडी प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. रब्बी हंगामात सुमारे ६ टीएमसी पाणी कालव्याद्वारे सोडण्याचे प्राथमिक नियोजन केले आहे. आवर्तन नियोजन जाहीर करण्याबाबत वरिष्ठांशी पत्रव्यवहार केला आहे. मंजुरी मिळताच कुकडी डावा कालव्यासह इतर कालव्यांत रब्बीचे आवर्तन सोडण्यात येईल.’’जे.बी.नान्नोर, कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग क्र.१.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.