Milk Rate : राज्यातील ३० टक्के दुधात भेसळ ; राधाकृष्ण विखे-पाटील

Raddhakrushna vikhe-patil : दूध भेसळ रोखू शकलो तरी दुधाला चांगला दर देता येईल,’’ असे मत पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केले.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilAgrowon

Karad News : ‘‘दूधदराच्या प्रश्नावर मार्ग काढण्याचा मी प्रयत्न करतोय. दुधाचे बटर आणि दूध पावडरीचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोसळल्याने भाव देता येत नाही, असे सांगितले जात आहे. मात्र वस्तुस्थिती तशी नाही. महाराष्ट्रात ३० टक्के दुधात भेसळ आहे. ही भेसळ रोखू शकलो तरी दुधाला चांगला दर देता येईल,’’ असे मत पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केले.

Radhakrishna Vikhe Patil
Milk Rate  : दूध उत्पादकांचं आंदोलन सहाव्या दिवशीही सुरूच; सरकार दखलही घेईना 

कोल्हापूरहून साताऱ्याकडे रवाना होण्यापूर्वी विखे कऱ्हाडला काहीकाळ थांबले. त्या दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दुधाला ३४ रुपये दर मिळावा, यासाठी नगरला उपोषण सुरू आहे, त्या प्रश्नावर विखे-पाटील म्हणाले, ‘‘आंदोलनकर्त्यांशी मी चर्चा केली आहे. काही दूध संघ, काही खासगी संस्था सरकारचा आदेश पाळत नाहीत, अशी तक्रार आहे. त्यासाठी खासगी, सहकारी दूध संघांची बैठक घेतली. त्यास उपोषणकर्ते अजित नवले, रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनाही बोलविले होते. मार्ग काढण्याचा मी प्रयत्न करतोय.

दुधाचे बटर आणि दूध पावडरीचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोसळल्याने भाव देता येत नाही, असे सांगितले जात आहे. मात्र वस्तुस्थिती तशी नाही. महाराष्ट्रात ३० टक्के दुधात भेसळ आहे. ही भेसळ रोखू शकलो तरी दुधाला चांगला दर देता येईल.’’

‘...तर दूध संघांचे परवाने रद्द’

मंत्री विखे-पाटील म्हणाले, ‘‘दूधदर प्रश्नासंदर्भात मी खासगी, सहकारी दूध संघांशी चर्चा करतोय. येत्या दोन-तीन दिवसांत अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. तरीही खासगी आणि सहकारी दूध संघ सरकारचे ऐकणार नसतील, तर त्यांचे परवाने रद्द करण्याबाबत कठोर निर्णय घ्यावा लागेल,’’ असा इशारा मंत्री विखे-पाटील यांनी दूध संघांना दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com