Fodder Maize Cultivation  Agrowon
ॲग्रो विशेष

Maize Cultivation : रब्बी मका लागवडीचे तंत्र

Maize Crop : मका हे तृणधान्य वर्गातील महत्त्वाचे पीक आहे. गहू व भात या पिकांनंतर मका पिकाचा जगात तिसरा क्रमांक लागतो.

Team Agrowon


डॉ. मधुकर बेडीस, डॉ. योगेश्‍वर पाटील, कैलास महाले

Maka cultivation : मका हे तृणधान्य वर्गातील महत्त्वाचे पीक आहे. गहू व भात या पिकांनंतर मका पिकाचा जगात तिसरा क्रमांक लागतो. मक्याचा उपयोग अन्नधान्याव्यतिरिक्त प्रामुख्याने स्टार्च, अल्कोहोल, प्लॅस्टिक धागे, गोंद, रंग, कृत्रिम रबर इ. उत्पादनामध्ये केला जातो. मका पिकाची लागवड खरीप हंगामापेक्षा रब्बी हंगामात केल्यास शाश्‍वत उत्पादन मिळू शकते.

हवामान व जमीन ः
मका हे उष्ण, समशीतोष्ण आणि थंड अशा सर्व हवामानात येणारे पीक आहे. मक्यासाठी मध्यम ते भारी, खोल, उत्तम निचरा असणारी, भरपूर प्रमाणात सेंद्रिय पदार्थ असणारी व जलधारणा शक्ती अधिक असलेली जमीन चांगली असते.

पूर्वमशागत ः
जमिनीची १५ ते २० सेंमी खोल नांगरट करावी. कुळवाच्या २ ते ३ पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुशीत करावी. त्यानंतर हेक्टरी १० ते १२ टन शेणखत टाकावे. हिरवळीचे खत जमिनीत गाडले असल्यास शेणखताची आवश्यकता भासत नाही.

पेरणी ः
- रब्बी हंगामात मका पिकाची १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत करावी.
- पेरणीसाठी सरी वरंबा पद्धतीचा अवलंब करावा. या पद्धतीने मका पिकाची टोकण पद्धतीने पेरणी करावी.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पेरणी अंतर ः (टोकण पद्धती)
- उशिरा आणि मध्यम जातींसाठी ः ७५ सें.मी. बाय २० सें.मी..
- लवकर पक्व होणाऱ्या जातींसाठी ः ६० सें.मी. बाय २० सें.मी.

बियाणे प्रमाण ः
हेक्टरी १५ ते २० किलो बियाणे पुरेसे होते.

वाण व वैशिष्ट्ये ः
१) राजर्षी ः

- एकेरी संकरित वाण
- उत्पादन हेक्टरी १०० ते ११० क्विंटल

२) मांजरी
- संमिश्र वाण
- उत्पादन ४० ते ५० क्विंटल

३) पंचगंगा ः
- संमिश्र वाण
- उत्पादन ४० ते ५० क्विंटल

४) करवीर ः
- संमिश्र वाण
- उत्पादन ः ५० ते ५५ क्विंटल

५) आफ्रिकन टॉल ः
- संमिश्र वाण (चाऱ्यासाठी उत्तम)
- उत्पादन ः हिरवा चारा ६० ते ७० टन तर धान्य उत्पादन ः ५० ते ५५ क्विंटल प्रति हेक्टर

बीजप्रक्रिया ः
करपा रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास,
- थायरम हे बुरशीनाशक २ ते २.५ ग्रॅम प्रमाणे चोळावे.
- ॲझॅटोबक्टर (जिवाणू संवर्धक) २५ ग्रॅम किंवा १०० मिलि प्रति किलो बियाण्यास लावून नंतर पेरणी करावी.

खत व्यवस्थापन ः
- पेरणीच्या वेळी हेक्टरी ४० किलो नत्र व ६० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावे.
- पेरणीनंतर ३० दिवसांनी ४० किलो नत्र आणि उर्वरित ४० किलो नत्र
पेरणीनंतर ४५ दिवसांनी द्यावी.

सिंचन व्यवस्थापन ः
मका पिकाच्या वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थांमध्ये पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात लक्षणीय घट येऊ शकते. रब्बी हंगामात जमिनीच्या मगदुरानुसार १० ते १२ दिवसांच्या अंतराने सिंचन करावे.
- पेरणीनंतर लगेच पाणी द्यावे.
- पेरणीनंतर २० ते ४० दिवसांनी (पिकाची शाकीय अवस्था)
- पेरणीनंतर ४० ते ६० दिवसांनी (पीक फुलोऱ्यात असताना)
- दाणे भरण्याच्या वेळी (७५ ते ८० दिवसांनी) पाणी द्यावे.

आंतरपिकांची निवड ः
- कडधान्ये वर्गीय ः उडीद, मूग, चवळी.
- तेलबिया पिके ः भुईमूग.
- भाजीपाला पिके ः मेथी, कोबी, कोथिंबीर, पालक.
-----------------------
डॉ. मधुकर बेडीस, ९८५०७७८२९०
(कृषी तंत्र विद्यालय, निमखेडी रोड, जळगाव)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT