Team Agrowon
रोपवाटिकेतून अधिक उंचीची कलमे घेत असताना पिशवीत मुळांची गुंडाळी झालेली नाही, याची खात्री करावी. एक वर्ष वयाची १० × १४ इंच आकाराच्या पिशवीत वाढलेली कलमे लावावीत.
पारंपारिक आंबा लागवडीसाठी साधारणतः १ x १ x १ मीटरच्या खड्ड्यांची शिफारस असते. सघन लागवडीमध्ये दोन झाडांतील अंतर मुळातच कमी ठेवले जात असल्यामुळे खोदयंत्राच्या साह्याने एक मीटर रुंद व एक मीटर खोल अशी चारी/नाली खोदून घ्यावी.
फळ बागेस पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाची व्यवस्था करावी. बागेला सुरुवातीपासून ठिबकद्वारे पाणी द्यावे. त्यासाठी बुंध्यात एक व उत्तर- दक्षिण बाजूला १ फूट अंतरावर ८ लिटर प्रति तास क्षमतेचे ड्रीपर लावावेत.
लागवडीनंतर पहिल्या वर्षी एक टोपले शेणखत, २५०-३०० ग्रॅम युरिया, २५०-३०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, ५०-१०० ग्रॅम एमओपी व ०.५ किलो निंबोळी पेंड ही खताची मात्रा द्यावी. त्यानंतर पुढील प्रत्येक वर्षी खतांच्या मात्रा त्याच प्रमाणात वाढवून द्याव्या.
वाढ मर्यादित ठेवण्याच्या दृष्टीने सघन लागवडीमध्ये छाटणीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कलम दीड ते दोन फूट उंचीचे होईपर्यंत एकच खोड राहू द्यावे. नंतर शेंडा मारावा. त्या ठिकाणाहून ३ ते ४ फांद्या निघतील.
आंब्यापासून दरवर्षी उत्पादन मिळण्यासाठी पॅक्लोब्युट्राझॉल या वनस्पती वाढ नियंत्रकाचा वापर करावा.
पावसाळा संपल्यावर ते फळवाढीच्या अवस्थेपर्यंत एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनाचा अवलंब करावा.