Fodder Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Fodder Crop : चारा पिकांचे लागवड तंत्र

Fodder Crop Cultivation Technique : खरीप हंगामात जून ते ऑगस्ट, तर उन्हाळी हंगामात फेब्रुवारी ते मार्च दरम्यान लागवड करता येते.

Team Agrowon

डॉ. गोविंद शिऊरकर, डॉ. बाळासाहेब सोनवलकर, मेघना बिचुकले

Fodder Crop Cultivation :

यशवंत गवत (संकरित नेपियर)

खरीप हंगामात जून ते ऑगस्ट, तर उन्हाळी हंगामात फेब्रुवारी ते मार्च दरम्यान लागवड करता येते.

सुधारित वाण : यशवंत, फुले जयवंत

बियाणे प्रमाण (हेक्टरी ) : ८ ते १२ किलो

पेरणी अंतर : ५० ते ६० सेंमी

कापणी : पहिली कापणी ६० ते ७० दिवस, नंतरच्या कापण्या ४५ ते ५५ दिवसांनी.

उत्पादन (हेक्टरी) : २००० ते २५०० क्विंटल

वैशिष्ट्ये

बारा महिने हिरवा चारा देणारे पीक आहे.

हत्ती गवताचा बहुवार्षिकपणा, जलद वाढ ही वैशिष्ट्ये आहेत.

जायंट बाजरीपासून मऊपणा, पालेदारपणा, गोडवा रसाळता हे गुण आणलेले आहेत.

एका वर्षात ७ ते ८ कापण्या होतात.

चवळी

खरीप हंगामात जून ते ऑगस्ट दरम्यान लागवड करता येते.

सुधारित वाण : श्वेता, इसी ४२१६, बुंदेल लोबिया

बियाणे प्रमाण (हेक्टरी ) : ४० किलो

पेरणी अंतर : ३० सेंमी

कापणी : ४५ ते ५० दिवस

उत्पादन (हेक्टरी) : ३०० ते ३५० क्विंटल

वैशिष्ट्ये

द्विदल वर्गाचे पीक आहे.

खरीप अथवा उन्हाळी हिरव्या चाऱ्यासाठी घेता येते.

जनावरांना पालेदार व पौष्टिक चारा मिळतो.

पिकाच्या मुळांवर रायझोबियम जिवाणू गाठी असल्याने नत्र साठवले जाते.

मका व ज्वारी बरोबर मिश्रपीकही घेता येते.

मारवेल

जून ते जुलै दरम्यान लागवड करता येते.

सुधारित वाण : मारवेल ७, मारवेल ४०, मारवेल ९३, फुले गोवर्धन

बियाणे प्रमाण (हेक्टरी) : ४० किलो

पेरणी अंतर : ३० ते ४० सेंमी

कापणी : ६० ते ६५ दिवस

उत्पादन (हेक्टरी) : जिरायत : २०० ते ३०० क्विंटल, बागायती २५० ते ३५० क्विंटल

वैशिष्ट्ये

बारीक खोडाचे बहुवार्षिक गवत आहे.

कमी पावसाच्या परिस्थितीत येते.

गवत १ ते २ मीटर उंच असते.

गवताची काडी बारीक, रसदार, लुसलुशीत व पौष्टिक असते.

गवत पानेदार व रुचकर असते.

जनावरे आवडीने खातात.

तंतुमय मुळांचे प्रमाण जास्त असल्यामुळे उताराच्या जमिनीची धूप कमी होते.

डॉ. गोविंद शिऊरकर, ९३०९०८१९४९

(लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय, कडेगाव, जि. सांगली)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

RBI Report : देशातील महागाई दर कमी होणार; रब्बी उत्पादन वाढीचा आरबीआयचा अंदाज 

Soybean Market : सोयाबीनच्या हमीभावाला बारदान्याची अडचण

Pandharpur Wari Management : वारी कालावधीत वारकऱ्यांच्या सुविधांबाबत योग्य नियोजन करावे

Crop Damage : मॉन्सूनोत्तर पावसाने पिकांचे अंदाजे २ कोटींचे नुकसान

Rural Development Department : यशवंत पंचायतराज समितीकडून सोलापूर जिल्हा परिषदेची तपासणी

SCROLL FOR NEXT