Fodder Cultivation Pattern : मराठवाड्याचा चारा लागवड पॅटर्न मार्गदर्शक

Marathwada Fodder Planting : राज्यातील इतर जिल्ह्यासाठी चारा लागवडीचा पॅटर्न मार्गदर्शक ठरणारा आहे.
Fodder Management Meeting
Fodder Management MeetingAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील टंचाई स्थितीतही पुरेसा चारा उपलब्ध राहिला आहे. या बाबत पशुसंवर्धन व कृषी विभागाचे कौतुक करून मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यांत या दोन्ही विभागांच्या चारा नियोजनामुळे हे शक्य झाले आहे.

राज्यातील इतर जिल्ह्यासाठी चारा लागवडीचा पॅटर्न मार्गदर्शक ठरणारा आहे. तसेच सप्टेंबरअखेरपर्यंत ज्या गावांना टँकरने पाणीपुरवठ्याची गरज भासेल, अशा गावांच्या कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेचे प्रस्ताव शासनाकडे पाठवा, असे निर्देशही डॉ. गोऱ्हे यांनी दिले.

Fodder Management Meeting
Fodder Availability : सांगलीत ९ लाख टन चाऱ्याची उपलब्धता

येथील विभागीय आयुक्त कार्यालयात बुधवारी (ता. ३१) विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी छत्रपती संभाजीनगर विभागातील टंचाई स्थिती व सवलतीबाबत प्रशासनाने केलेली कार्यवाही तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह महिलांच्या विविध कल्याणकारी योजनांचा आढावा घेतला.

या वेळी विभागीय आयुक्त दिलीप गावडे, पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त जगदीश मिनीयार, नयना बोंदार्डे, डॉ. अनंत गव्हाणे, महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त गणेश पुंगळे, महिला व बालविकास विभागाच्या डॉ. सीमा जगताप, कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे, शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

Fodder Management Meeting
Fodder Shortage : राहुरी कृषी विद्यापीठात २७ हजार टन चारा विक्रीस

डॉ. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा, असे निर्देश दिले. योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. २४ लाखांवर अर्ज आले आहेत. कामगार कल्याण विभागाकडे घर कामगार महिलांची नोंदणी असते. त्यांनी असंघटित महिलांना लाभ देण्यासाठी पुढाकार घ्यावा. नवीन कायद्यांबाबत माहिती देण्यासोबतच अनाथ मुलींना लग्नानंतर माहेरपण असायला हवे, यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देत एक माहेरपण जपणारी संकल्पना जपण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी बैठकीत दिल्या.

महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजना, शासकीय महिला राज्यगृह, सखी वन स्टॉप सेंटर, महिला सक्षमीकरण केंद्र, समुपदेशन केंद्र, सखी निवास तसेच बालकांसाठीच्या योजनांचाही आढावा घेतला. विभागीय आयुक्त दिलीप गावडे, उपायुक्त डॉ. अनंत गव्हाणे व उपायुक्त नयना बोंदर्डे यांनी टंचाई स्थितीबाबत माहिती दिली.

या वेळी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे लाभार्थी प्रीतम कचरू सोनवणे रा. बहिरगाव, ता. कन्नड, शहा असिफशहा प्यारुशहा रा. यासिन नगर, जळगाव रोड, हर्सूल तसेच श्री. शेख अयाज रशीद पटेल, रा. पटेल नगर, हर्सूल यांना लाभाचे वितरण करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com