Rain Damage Relief: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकार पाने पुसणार
Maharashtra Crop Loss: ‘‘राज्यात पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. पंचनामे करून त्यांना मदत केली जाईल,’’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले असले तरी या मदतीसाठी जुने निकष वापरले जाणार असल्याने शेतकऱ्यांची तुटपुंज्या मदतीवर बोळवण केली जाणार आहे.