Boring Wells  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : रत्नागिरीत १२ हजार सिंचन विहिरींचे उद्दिष्ट

Well Irrigation : शेतीचे उत्पादन वाढण्यासाठी, अधिकाधिक पिके घेण्यासाठी पाणी ही सर्वांत मोठी गरज आहे.

Team Agrowon

Ratnagiri News : शेतीचे उत्पादन वाढण्यासाठी, अधिकाधिक पिके घेण्यासाठी पाणी ही सर्वांत मोठी गरज आहे. त्यामुळे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १२ हजार ६९० सिंचन विहिरी बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

शेतकरी आपल्या शेतात या योजनेचा लाभ घेऊन चांगल्या प्रकारचे उत्पन्न घेऊ शकतात. तसेच या योजनेअंतर्गत विहिरींच्या कामासाठी १०० दिवसांचा मनुष्यबळाचा खर्च केंद्रस्तरावर, तर अतिरिक्त लागणारा दिवसाचा मनुष्यबळाचा खर्च राज्यस्तरावर देण्यात येणार आहे.

या योजनेमुळे खरीप हंगामाबरोबरच रब्बी हंगामातही लागवडीला प्रोत्साहन मिळणार आहे. त्याचबरोबर केवळ पावसाच्या पाण्यावर चालणाऱ्या शेतीबरोबरच उन्हाळ्यातही सिंचनासाठी पाणी स्रोत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात ८४६ ग्रामपंचायती आहेत. जिल्ह्याला मिळालेले उद्दिष्ट पाहता प्रत्येक ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात विहिरींची खोदाई करता येणार आहे. ज्या लाभार्थ्यांकडे ४० गुंठे जमीन असेल, त्यांनाच या सिंचन विहिरींचा लाभ मिळणार आहे. या विहिरी खोदाईसाठी चार लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे.

तालुका विहिरींचे उद्दिष्ट

* मंडणगड ७३५

* दापोली १५९०

* खेड १७१०

* गुहागर ९९०

* चिपळूण १९५०

* संगमेश्वर १८९०

* रत्नागिरी १४१०

* लांजा ९००

* राजापूर १५१५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief: मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीने मदत द्या

Exam Stress Relief : परीक्षा जवळ आलीये अन् टेन्शन वाढलंय? 'या' सोप्या टिप्सने ताण होईल छुमंतर!

Women Farmers Contribution: मोरोक्कोच्या बहरलेल्या शेतीतील अदृश्य हात

Interview With Rakesh Kaithwas : शेतकरी कंपन्यांच्या बळकटीकरणातून मूल्यवर्धनाला चालना

Bullock Safety Tips: बैलाच्या वजनानुसार बैलगाडीत किती ऊस भरावा?

SCROLL FOR NEXT