Agriculture Irrigation : भामा आसखेडचे आवर्तन तब्बल २८ दिवसांनंतर बंद

Bhama Askhed Dam : २० मार्चपासून सुरू असणारे भामा आसखेड (ता. खेड) धरणातील आवर्तन तब्बल २८ दिवसांनंतर बंद करण्यात आले आहे.
Bhama Askhed
Bhama Askhed Agrowon

Pune News : २० मार्चपासून सुरू असणारे भामा आसखेड (ता. खेड) धरणातील आवर्तन तब्बल २८ दिवसांनंतर बंद करण्यात आले आहे. या कालावधीत धरणातील पाणीसाठा २७ टक्क्यांनी कमी झाला आहे. एकीकडे पाणी बंद करण्यात आले असून दुसरीकडे मात्र अधिकारी म्हणतात की पाणी बंद करण्याबाबत चर्चा सुरू आहे.

अनेक अधिकाऱ्यांकडे याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता कुणीही स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला. बरेच दिवस आवर्तन सुरू असल्याने पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. धरणाच्या बुडीत क्षेत्रातील लोक आणि या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया या आवर्तनाबाबत व्यक्त झाल्या होत्या.

Bhama Askhed
Agriculture Irrigation : सिंचनासाठी क्षारयुक्त पाणी वापरताना घ्यावयाची काळजी

सलग २८ दिवस आवर्तन सुरू असल्याने खेड तालुक्यातील पश्चिम भागात पाण्याची भीषण टंचाई जाणवायला सुरुवात झाली होती. धरणाच्या काही बुडीत भागात तर जनावरांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरू झाली होती.

Bhama Askhed
CM Agriculture Irrigation : मुख्यमंत्री कृषी सिंचन अंतर्गत १५१ शेततळ्यांची कामे पूर्ण

कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार दुष्काळजन्य परिस्थितीमुळे २० मार्चपासून आलेगाव पागापासून पुढे असणारे ७ बंधारे भरण्यासाठी हे पाणी सोडण्यात आले होते. त्यासाठी धरणाच्या आयसीपीओ मधून १००० क्युसेस वेगाने हे पाणी सोडणे सुरू होते.

आलेगाव पागापर्यंत असणारे १८ बंधारे आणि पुढील ७ बंधारे या आवर्तनातून भरले जाणार होते. आवर्तन बंद केव्हा होणार याबाबत अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता अनेक अधिकाऱ्यांकडून याबाबत आमच्या वरिष्ठांशी बोला, असे सांगण्यात येत होते. याबाबत जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पाणी बंद करण्याबाबत चर्चा सुरू आहे, तुम्हाला कळवू, असे सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com