Jalgaon DPDC Agrowon
ॲग्रो विशेष

Government fund : फेब्रुवारीअखेर शंभर टक्के निधी खर्चाचे ‘टार्गेट’

Jalgaon DPDC Fund : आगामी लोकसभा निवडणूकांची सगळीकडे तयारी सुरु असतांना, आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवर त्याचे पडसाद दिसले.

Team Agrowon

Jalgaon News : जिल्हा नियोजन निधी प्राप्त होणाऱ्या सर्व यंत्रणांनी २०२३-२४ वर्षाच्या कामांचे १०० टक्के कार्यारंभ आदेश १५ दिवसांत द्यावेत, तसेच फेब्रुवारीअखेर १०० टक्के निधी खर्च करण्याचे ‘टार्गेट’ निश्‍चित करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.

आगामी लोकसभा निवडणूकांची सगळीकडे तयारी सुरु असतांना, आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवर त्याचे पडसाद दिसले. त्यामुळे इलेक्शन इफेक्ट म्हणून डीपीसी बैठकीची चर्चा होती.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत, नियोजन समितीच्या वार्षिक योजनेतील २०२३-२४ मधील सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी घटक योजनेतील प्रशासकीय मान्यता, कार्यारंभ आदेश, निधी वितरणाचा तसेच आमदारांनी स्थानीक विकास निधीतून सुचविलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला.

जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, यावल आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार, समाजकल्याण सहायक आयुक्त कार्यालयाचे अध‍िकारी राजेंद्र कांबळे आदी उपस्थित होते.

कामांना भेट द्या

जिल्हाधिकारी श्री. प्रसाद म्हणाले की, सर्व विभाग प्रमुखांनी काम सुरू असलेल्या ठिकाणांना भेटी द्याव्यात. कार्यारंभ आदेश देऊनही काम सुरू झाले नसल्यास ठेकेदारांना तत्काळ सूचना देण्यात याव्यात.

२५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत सर्व कामे पूर्ण करण्यात यावी. अर्धवट स्वरूपात पूर्ण झालेल्या कामांचे उद्‌घाटन करण्यात येऊ नये. नवीन कामे ऐनवेळी प्रस्ताव‍ित करण्यात येऊ नयेत. २०२४-२५ चा प्रारूप आराखडा ही सादर करावा, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT