Sangli DPDC : जिल्हा नियोजनचे ४०५ कोटींपैकी ११३ कोटी खर्च

Sangli District Planning : २०२३-२४ आर्थिक वर्ष संपत आले तरी जिल्हा नियोजन समितीच्या ४०५ कोटींच्या निधीपैकी अवघे ११३ कोटी रुपये खर्च झाले.
Sangli ZP
Sangli ZPAgrowon
Published on
Updated on

Sangli News : २०२३-२४ आर्थिक वर्ष संपत आले तरी जिल्हा नियोजन समितीच्या ४०५ कोटींच्या निधीपैकी अवघे ११३ कोटी रुपये खर्च झाले. वर्ष संपण्यास पावणेतीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना निधी कसा खर्च करणार? असा सवाल नियोजन समितीच्या सभेत विरोधी आमदारांनी केला.

निधी खर्चास जाणीवपूर्वक विलंब झाल्याच्या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी मार्चअखेरपर्यंत खर्चाचे नियोजन करण्याचे आश्वासन दिले. जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता. ११) झाली.

Sangli ZP
Nagar DPDC : सहाशे तीस कोटींच्या आराखड्यास मान्यता

या वेळी खासदार संजय पाटील, आमदार अरुण लाड, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अनिल बाबर, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुमन पाटील, आमदार विश्वजीत कदम, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, अप्पर पोलिस अधीक्षक रितू खोखर, महापालिका आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांच्यासह जिल्हास्तरीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

Sangli ZP
Pune DPDC Meeting : एक हजार १२८ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता

पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, की जिल्हा वार्षिक (सर्वसाधारण) योजनेतून ४०५ कोटी रुपये नियतव्यय मंजूर आहे. त्यापैकी रक्कम रुपये २८४ कोटी प्राप्त असून, २१३ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ४५ टक्के निधी वितरित करण्यात आला आहे. सध्या विकासकामांवर अवघे ११३ कोटी रुपये खर्च झाले.

उर्वरित कामांच्या प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही १५ दिवसांत पूर्ण करावी व मार्च २४ अखेर निधी खर्च करावा. कोणताही निधी परत जाणार नाही, याची दक्षता सर्व यंत्रणांनी घ्यावी. विरोधी आमदारांनी, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. निधी असूनही आराखडा आणि मंजुरीअभावी अखर्चित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com