Jalgaon DPDC : जिल्हा ‘नियोजनात’ जळगाव आघाडीवर

Jalgaon District Planning : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ५ जानेवारीला झालेल्या बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मदत, पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांच्यासमोर मी कामकाजाचे सादरीकरण केले.
Ayush Prasad
Ayush PrasadAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांच्या १६६ समित्यांचा नियमित आढावा घेण्यात येत आहे. सूचनांची अंमलबजावणी होते की नाही, याचा पाठपुरावा सातत्याने केला जातो. या बैठकांमध्ये उपस्थित ८१९ मुद्यांपैकी ५६६ मुद्यांवर जलद कार्यवाही करण्यात आली.

यामुळेच जिल्हा नियोजन कामांना प्रशासकीय मान्यता, निधी वितरण व खर्चात जळगाव जिल्हा राज्यात अव्वल आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी जुलै २०२३ मध्ये जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार घेतला. गेल्या वर्षातील कामाची माहिती ते पत्रकारांना देत होते.

प्रसाद म्हणाले, की प्रत्यक्ष क्षेत्रीय पातळीवर कामांना गती मिळाली. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला शेळगाव मध्यम प्रकल्प, नदीजोड प्रकल्प भूसंपादनग्रस्तांना निधी वितरण, पिंप्राळा रेल्वे उड्डाण पूल, विमानतळ रुंदीकरण, जामनेर रेल्वे स्थानक भूसंपादन या प्रकल्पांना गती मिळाली व त्यांची वाटचाल पूर्णत्वाकडे होऊ शकली.

मंत्र्यांसमोर सादरीकरण

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ५ जानेवारीला झालेल्या बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मदत, पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांच्यासमोर मी कामकाजाचे सादरीकरण केले.

केंद्र सरकार, राज्य शासनाच्या‌ कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणे, जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेणे, अंमलबजावणीदरम्यान येणाऱ्या अडचणी शासकीय विभागांच्या समन्वयातून सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर विविध समित्यांची स्थापना शासन निर्णयाद्वारे करण्यात आली आहे.

Ayush Prasad
Satara DPDC Meeting : सातारा जिल्ह्याचा ७३२ कोटींचा आराखडा

दरमहा बैठका

सर्व प्रशासकीय विभागांमध्ये समन्वय असावा व कामकाजाचा गतीने निपटारा व्हावे, या उद्देशाने दरमहा बैठकींचे आयोजन पहिल्या सोमवारी, पहिल्या मंगळवारी निश्‍चित करून परिपत्रक निर्गमित करण्यात येतात. सर्व विभागप्रमुखांना त्याची प्रत उपलब्ध करून देण्यात येते. एका प्रशासकीय विभागाच्या बैठका एका दिवशी आयोजित होतील, अशा पद्धतीने बैठकांचे २२ गट निश्‍चित करण्यात आले.

Ayush Prasad
Beed DPDC Meeting : उद्दिष्टपूर्ती करा; आगामी काळात वाढीव निधी

या सर्व समित्यांना जिल्हा नियोजन समितीच्या उपसमिती असल्याचे घोषित करण्यात आले. त्यामुळे बैठकांमध्ये विविध प्रशासकीय मुद्यांवर गांभीर्याने चर्चा होऊन कार्यवाही करावयाच्या मुद्यांबाबत निश्‍चित कालमर्यादा आखून देण्यात येते.

बैठकांच्या आयोजनासाठी जिल्हाधिकाऱ्यांची वेळ घेणे, त्यासाठी कालापव्यय करणे यात बचत झाली. निश्‍चित दिवशी व वेळी बैठक होणार आहे, याची खात्री असल्याने विभागप्रमुखांना त्यांच्या कामकाजाचे नियोजन करणे शक्य झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com