Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Water Shortage : अठरा गावांत टॅंकर; दहा गावांत विहिरींचे अधिग्रहण

Water Issue : घनसावंगी तालुक्‍यात यंदा पाणीटंचाईची तीव्रता जानेवारी महिन्याच्या प्रारंभीच जाणवली. तालुक्‍यातील १८ गावांत टँकरने तर दहा गावांत विहिरींचे अधिग्रह करून पाणीटंचाईवर मात करण्यात येत आहे.

Team Agrowon

Jalna News : घनसावंगी तालुक्‍यात यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने आता पाणीटंचाईची तीव्रता अधिक वेगाने जाणवू लागल्याने नागरिक धास्तावले असून तालुक्‍यातील १८ गावांत टँकरने तर दहा गावांत विहिरींचे अधिग्रह करून पाणीटंचाईवर मात करण्यात येत आहे. असे असले तरी दिवसेंदिवस पाण्यासाठी ओरड होत असल्याचे चित्र आहे.

घनसावंगी तालुक्‍यात यंदा पाणीटंचाईची तीव्रता जानेवारी महिन्याच्या प्रारंभीच जाणवली. गावोगावी पाण्याचे स्रोत आटल्याने नागरिकांची पाण्यासाठी ओरड सुरू झाली आहे. तालुक्‍यातील बोरगाव खुर्द अंतर्गत तीन तांडे,

मासेगाव, बोरगाव खुर्द अंतर्गत भीमनगर, शेवगळ, शेवगळतांडा, कंडारी परतूर, येवला, यावलपिंपरीतांडा, शिंदेवडगाव, सरफगव्हाण, पारडगाव, पांगरा व पांगरा तांडा, माहेरजवळा, लमाणवाडी,

ढाकेफळ तांडा क्रमांक एक व दोन, पिरगॅबवाडी या गावात प्रत्येकी एक टँकरने तर रांजणी येथे चार टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच देवळीपरतूर, मुंगळानाईक तांडा, राजंणी, डहाळेगाव, डहाळेगाववाडी, बाचेगाव, बोररांजणी, वडीरामसगाव, देवळीअंबड, माहेरजवळा या गावांत विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

तसेच राहेरा, बोधलापुरी, मोहपुरी येथे पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत असल्याने तेथे उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

पंचायत समितीकडे आलेल्या प्रस्तावानुसार उपाययोजनांचे काम हाती घेण्याचे काम आम्ही करीत आहेत. नागरिकांच्या तक्रारींनुसार टँकर व विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालयात दाखल करण्यात येत आहेत.
पी.डी. चौधरी, विभाग प्रमुख, पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती, घनसावंगी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Alert: राज्यात २ दिवस पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ हवामानामुळे थंडी कमी

Ration Card Verification: रेशनचे पावणेदोन लाख संशयित लाभार्थी रडारवर!

Parliament Budget Session 2026: राहुल गांधींकडून नरवणेंच्या पुस्तकाचा उल्लेख, लोकसभेत गदारोळ, नेमकं काय झालं?

Mission Mausam : 'मिशन मौसम'साठी अर्थसंकल्पात वाढीव तरतूद; तर 'डीप ओशन मिशन'साठी तरतूद घटली

Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT