Chana Farm Management: शेतकरी नियोजन । पीक : हरभराशेतकरी : प्रकाश रामेश्वर धांडेगाव : येसापूर, ता. लोणार,जि. बुलडाणाएकूण शेती : १४ एकरहरभरा क्षेत्र : साडेसहा एकर.लोणार (जि. बुलडाणा) तालुक्यातील येसापूर येथील प्रकाश धांडे हे प्रयोगशील शेतकरी म्हणूनओळखले जातात. वडिलोपार्जित १४ एकर शेतीचे व्यवस्थापन ते करतात. यावर्षी खरिपामध्ये टोकण पद्धतीने साडेसहा एकरांत सोयाबीनची सलग लागवड केली. तर तीन एकरांत सोयाबीन अधिक तूर अशी आंतरपीक पद्धतीने लागवड केली होती. याशिवाय दोन एकरांत आले पीक घेतले आहे. खरिपातील सलग सोयाबीन पीक काढणी केल्यानंतर संपूर्ण साडेसहा एकर क्षेत्रामध्ये रब्बीत हरभरा लागवड सुरु केली आहे. यातील तीन एकरांत खासगी कंपनीच्या हरभरा वाणाची, साडेतीन एकरांत काबुली हरभऱ्याच्या फुले कृपा या वाणाच्या लागवडीचे नियोजन त्यांनी केले आहे..पेरणी नियोजनकाबुली हरभऱ्याची पट्टा पद्धतीने बैलचलित टोकण यंत्राद्वारे पेरणीचे नियोजन केले. तर खासगी कंपनीच्या वाणाची ट्रॅक्टरचलित यंत्राद्वारे पेरणी करण्याचे नियोजित होत. त्यानुसार पेरणीपूर्वी शेतातील उगवलेले तण, सोयाबीन पिकाची धस्कटे गोळा करून शेताची स्वच्छता केली. त्यानंतर ओलावा टिकून राहण्यासाठी बैलजोडीच्या साह्याने वखरणी केली. शेतात वाफसा तयार झाल्यानंतर हरभरा पेरणीची तयारी सुरु केली आहे..Chana Farming : हरभरा पिकातून दुहेरी उत्पन्न.हरभरा पिकामध्ये मर रोगाच्या प्रादुर्भावामुळे मोठे नुकसान होते. त्यासाठी मर रोगास कमी प्रमाणात बळी पडणाऱ्या सुधारित वाणांची लागवडीस निवड केली आहे. तर काबुली हरभऱ्याचा फुले कृपा हा वाण वापरला.तीन एकरांत लागवड करण्यासाठी खासगी कंपनीचे एकरी ३५ किलो बियाणे लागले. तर काबुली हरभऱ्याचा फुले कृपा वाणाची टोकण पद्धतीने लागवड करण्यास एकरी ४५ ते ५० किलो बियाणे लागले..लागवडीपूर्वी बीजप्रक्रिया करण्यास प्राधान्य दिले जाते. जैविक व रासायनिक घटकांची हरभरा बियाणास बीजप्रक्रिया केली जाते. त्यासाठी शिफारशीत घटकांचे द्रावण तयार करून प्रतिकिलो बियाणांस बीजप्रक्रिया करून त्वरित पेरणी करण्यात आली..लागवड पद्धतट्रॅक्टरद्वारे पेरणी करतेवेळी जमिनीतील वाफसा स्थिती पाहून पेरणी करण्यात आली. तर काबुली हरभरा लागवडीसाठी दोन पद्धतीचा अवलंब केला आहे. पावणे दोन एकरांतील सोयाबीन काढणीनंतरच्या बेडवर एसआरटी पद्धतीने टोकण केली. तर पावणेदोन एकर क्षेत्रावर बैलजोडीच्या पेरणी यंत्राने खत पेरून २.२५ फूट बाय १.५ फूट पट्टा ठेवून ६ इंचावर एक ते दोन दाणे बियाणे पेरून घेतले..खरिपामध्ये शेतात शेणखताचा वापर केल्यामुळे रब्बी लागवडीपूर्वी शेणखताचा पुन्हा वापर करण्यात आला नाही.हरभरा पिकास डीएपी खताचा एकरी एक बॅग प्रमाणे वापर करण्यात आला आहे.तीन एकरांतील हरभरा पेरणी साधारण १२ नोव्हेंबरच्या दरम्यान केली. तर काबुली हरभऱ्याची १७ नोव्हेंबरच्या दरम्यान लागवड करण्यात आली आहे..Chana Farming : मजूरटंचाईसह पाण्याची समस्या झेलत हरभरा केला यशस्वी .सिंचन व्यवस्थापनकाबुली हरभऱ्याची टोकण केल्यामुळे बियाणे कमी खोलीवर पेरले जाते. त्यामुळे टोकण झाल्याबरोबर स्प्रिंकलरच्या साह्याने चांगल्या दाबावर दोन तास हलके पाणी देण्यात आले. काबुलीला दुसरे ओलित तर अन्य क्षेत्रातील हरभरा लागवडीस पहिले ओलित स्प्रिंकलरच्या साह्याने चांगला दाब ठेवून फांद्या फुटण्यापूर्वी म्हणजेच २५ ते ३० दिवसांदरम्यान दिले जाईल. त्यामुळे चांगल्या फांद्या फुटून पिकाची उत्तम वाढ होते, असा त्यांचा अनुभव आहे. दुसरे ओलित चांगली फुले लागल्यानंतर अर्धे घाटे व अर्धे फुले असताना व पीक काळोखे (हिरवेगार) आल्यानंतर देण्याचे नियोजन असते. त्यामुळे फुले न थांबता घाटे धरणे सुरु राहते. तसेच घाट्यांमध्ये दाणे सुद्धा भरतात. आवश्यकता पडल्यास तिसरे.पाणी घाटे भरण्यासाठी दिले जाईल. अधिक फांद्या फुटण्यासाठी शेंडे खुडण्याची कार्यवाही केली जाते. काबुली हरभऱ्याला दुसरे पाणी देण्यापूर्वी २० ते २५ दिवसांदरम्यान मजुरांच्या साह्याने शेंडे खुडून घेतले जातात..कीड व रोग व्यवस्थापनहरभरा पिकाचे कीड-रोगांच्या प्रादुर्भावासाठी नियमित निरीक्षण केले जाते. आवश्यकतेनुसार पहिली रासायनिक फवारणी शेंडे खुडणीनंतर २० ते २५ दिवसांनी केली जाते. दुसरी फवारणी घाटे भरताना किडींचे निरीक्षण करून केली जाते. घाटेअळीच्या प्रादुर्भावासाठी शेतामध्ये पक्षिथांबे उभारले जातील. वाढत्या थंडीत पिकाचे धुक्यापासून संरक्षण करण्यासाठी पहाटेच्या वेळी शेतात शेकोट्या पेटवून धूर केला जातो. दरवर्षी याप्रमाणे नियोजन केल्यामुळे अपेक्षित उत्पादन मिळण्यास मदत होते, असे प्रकाश धांडे सांगतात.- प्रकाश धांडे ९८८१८३४५८४(शब्दांकन : गोपाल हागे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.