Water Crisis : तीन जिल्ह्यांतील २०५ गावे, ३७ वाड्यांना टंचाईच्या झळा

Water Shortage : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील २०५ गावे व ६७ वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा बसणे सुरू झाले आहे.
Water Shortage
Water ShortageAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील २०५ गावे व ६७ वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा बसणे सुरू झाले आहे. घटते पाणीसाठे व खालावत असलेली भूजलाची पातळी टंचाई अधिक तीव्र होण्याची सूचना देते आहेत.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमधील १२६ गाव व २९ वाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री, पैठण, गंगापूर, वैजापूर, कन्नड, सिल्लोड आदी तालुक्यांतील गाव तसेच छत्रपती संभाजीनगर, पैठण, वैजापूर व सिल्लोड तालुक्यांतील वाड्यांचा यामध्ये समावेश आहे.

Water Shortage
Water Scarcity : राज्यात पाणी टंचाई गंभीर वळणावर

या गावांची तहान भागविण्यासाठी १८९ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. दुसरीकडे जालना जिल्ह्यातील ७८ गावे व ३५ वाड्यांनाही पाणीटंचाईची तीव्र झळ बसते आहे. यामध्ये जालना, बदनापूर, भोकरदन, जाफराबाद, अंबड, घनसांगवी आदी तालुक्यांतील गाव व शहराचा तसेच जालना, बदनापूर, भोकरदन, मंठा, अंबड, घनसांगवी या तालुक्यांतील वाड्यांचा समावेश आहे.

जालना जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारण्यासाठी १४५ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात एक गाव व तीन वाड्यांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागत. या ठिकाणी पाणीपुरवठा करण्याकरिता एका शासकीय टँकरची सोय करण्यात आली आहे. तीनही जिल्हे मिळून जवळपास ३३५ टँकरने आताच्या घडीला टंचाईग्रस्त गाव व वाड्यांना पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये तब्बल ३३४ खासगी तर एका शासकीय टँकरचा समावेश आहे.

Water Shortage
Water Scarcity : जळगाव जिल्ह्यात टंचाई वाढू लागली

३४० विहिरींचे अधिग्रहण

पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाकडून टँकर व टँकर व्यतिरिक्त पाणीपुरवठ्यासाठी ३४० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये टँकर ला पाणीपुरवठा करण्यासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या ११० तर टँकर व्यतिरिक्त पाणीपुरवठा करण्यासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या २३० विहिरींचा समावेश आहे. जिल्हा निहाय अधिग्रहित विहिरींमध्ये छत्रपती संभाजीनगरमधील ११५, जालन्यातील १०२, परभणीतील ५२, नांदेडमधील २, बीडमधील १४ व धाराशिवमधील ५५ विहिरींचा समावेश आहे.

तालुकानिहाय टंचाईग्रस्त गाव वाड्या व टँकरची संख्या

तालुका गाव वाड्या टँकर

छ. संभाजीनगर २६ १२ ३२

फुलंब्री १६ ०० १८

पैठण ३४ ८ ४७

गंगापूर १२ ०० ४०

वैजापूर १७ ०२ १९

कन्नड ०४ ०० ०५

सिल्लोड १७ ०७ २८

जालना १२ ०४ २५

बदनापूर १४ ११ २०

भोकरदन २९ ०४ ३५

जाफराबाद ०१ ०० ०३

अंबड ०७ ०१ १२

घनसांगवी १४ १४ २४

भोकरदन न. प ०१ ०० २५

गेवराई ०१ ०३ ०१

दोन महिन्यांपासून एका टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. काटकसरीने पाणी वापरूनही ओढतान होते आहे. आता तर थोडेफार असलेले विहिरीतले पाणीही संपल्यात जमा असल्याने जनावरांनाही टँकरमधून मिळणारेच पाणी पाजण्याची वेळ येईल. आणखी चार महिने उन्हाळा बाकी आहे.
विलास भेरे, कोणेवाडी, ता. जि. छत्रपती संभाजीनगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com