Water Crisis : नांदेडला पाणीसाठ्यात घट

Water Storage : नांदेड जिल्ह्यात तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन वाढले आहे. यासह शेतीसिंचनासाठी पाणी सोडण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे.
Water Storage
Water StorageAgrowon
Published on
Updated on

Nanded News : नांदेड जिल्ह्यात तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन वाढले आहे. यासह शेतीसिंचनासाठी पाणी सोडण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. सध्या एकूण १०४ प्रकल्पांत ३३३.५२ दशलक्ष घनमीटरनुसार ४५.८१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

मागील पंधरा दिवसांत पाणीसाठ्यात तीस दशलक्ष घनमीटर पाणीसाठ्यात घट झाल्याची माहिती नांदेड पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. जिल्ह्यात मागील पावसाळ्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे संपूर्ण प्रकल्पात चांगला पाणीसाठा झाला होता. यामुळे जिल्ह्यातील सर्वच १०४ प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाला होता.

Water Storage
Water Storage : कुकडी प्रकल्पात ५३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक

परंतु सध्या तापमानात झालेल्या वाढीमुळे पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. तसेच शेतीसिंचनासाठी पाणीपाळ्या देण्यात येत असल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने घट झाली आहे. आजघडीला जिल्ह्यात मोठा प्रकल्प असलेल्या विष्णुपुरी प्रकल्पात सध्या प्रकल्पात ३०.५४ दलघमीनुसार ३७.५५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

तर दुसरा मोठा प्रकल्प असलेल्या मानार (बारुळ) प्रकल्पात ५०.७१ दलघमीनुसार ३६.६९ टक्के पाणीसाठा आहे. यासोबतच जिल्ह्यातील नऊ मध्यम प्रकल्पात ५२.८८ दलघमीनुसार ३८.०३ टक्के पाणीसाठा आहे. चार कोल्हापुरी बंधाऱ्यात १.४१ दलघमीनुसार १९.०१ टक्के पाणीसाठा आहे, ८० लघू प्रकल्पांत ८६.३२ दलघमीनुसार ४९.९५ टक्के पाणीसाठा आहे.

नऊ उच्चपातळी बंधाऱ्‍यात १११.८५ दलघमीनुसार ५८.९३ टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यात एकूण १०४ प्रकल्पांत ३३३.५२ दशलक्ष घनमीटरनुसार ४५.८१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यासोबतच नांदेड जिल्ह्याशेजारी असलेल्या परभणी जिल्ह्यातील येलदरी प्रकल्पात ३३९.०२ दलघमीनुसार ४१.८७ टक्के पाणीसाठा आहे.

Water Storage
Water Storage : परभणीतील मध्यम प्रकल्पांत सरासरी ८ टक्के उपयुक्त पाणीसाठा

सिद्धेश्‍वर प्रकल्पात ६६.७३ दलघमीनुसार ८२.४३ टक्के पाणीसाठा आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील ऊर्ध्व पैनगंगा (इसापूर) या प्रकल्पात ५८८.०७ दलघमीनुसार ६१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. (ता. ८) फेब्रुवारी रोजी ३८३.३५ दलघमीनुसार ५२.६५ टक्के पाणीसाठा होता, अशी माहिती नांदेड पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.

जिल्ह्याशेजारील प्रकल्प

येलदरी ३३९.५२ ४१.८७

सिद्धेश्‍वर ६६.७३ ८२.४३

इसापूर ५८८.०७ ६१.००

नांदेड पाटबंधारे मंडळातील प्रकल्पनिहाय पाणीसाठा

प्रकल्प दलघमी टक्केवारी

विष्णुपुरी ३०.७१ ३७.५५

मानार ५०.७१ ३६.६९

मध्यम प्रकल्प (९) ५२.८८ ३८.०३

लघू प्रकल्प (८०) ८६.३२ ४९.९५

उच्चपातळी बंधारे (९) १११.८५ ५८.९३

एकूण प्रकल्प १०४ ३३३.५२ ४५.८१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com