Tur Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Farming: अडीच एकरांत घेतले ३२ क्विंटल तूर उत्पादन

Tur Production: वर्डी (ता. चोपडा, जि. जळगांव) येथील गोकूळ सदा सुलताने हे निवृत्त माध्यमिक शिक्षक आहेत. त्यांनी अडीच एकर क्षेत्रात सलग तूर पिकाची टोकण २० जून २०२४ रोजी केली. ५ फूट बाय दीड फूट अंतरावर केलेल्या लागवडीसाठी ६ बॅग बियाणे लागले.

Team Agrowon

Tur Crop Management: वर्डी (ता. चोपडा, जि. जळगांव) येथील गोकूळ सदा सुलताने हे निवृत्त माध्यमिक शिक्षक आहेत. त्यांनी अडीच एकर क्षेत्रात सलग तूर पिकाची टोकण २० जून २०२४ रोजी केली. ५ फूट बाय दीड फूट अंतरावर केलेल्या लागवडीसाठी ६ बॅग बियाणे लागले. पेरणीचे वेळी ५ बॅग १५:१५:१५ संयुक्त खत दिले. दोन ओळींतील ५ फुटांच्या जागेत वखराने ४ वेळा वखरणी केली. निंदणीने शेत तणमुक्त केले.

शेवटच्या वखरणीवेळी दोन ओळींच्या मधोमध जानोळ्याला दोरी गुंडाळून दांड पाडून घेतले. यामधून एकसरी आड दोन वेळा ओलित केले. पहिले ओलित फुलोरा अवस्थेपूर्वी, तर दुसरे ओलित शेंगांमध्ये दाणे भरताना दिले. तूर कंबरेइतक्या उंचीची झाल्यावर छाटणी केली. फांद्यांच्या अवस्थेत खताचा दुसरा हप्ता (१५: १५:१५:०९ - ३ बॅग व युरिया ३ बॅग) दिला.

तर फुलोऱ्यापूर्वी खताचा तिसरा हप्ता युरिया ३ बॅग, सिंगल सुपर फॉस्फेट ३ बॅग, दाणेदार बोरॉन व झिंक दिले. गरजेनुसार कीड-रोग नियंत्रणासाठी ४ फवारण्या केल्या. अशा योग्य नियोजनामुळे गोकूळ सुलताने यांना अडीच एकरांत ३२ क्विंटल तूर उत्पादन झाले. त्याला ६५५१ रुपये दर मिळाला. त्याचे २,०९,६३२ रुपये आले. तूर कुटाराचे १३ हजार रुपये मिळाल्याने तुरीतून एकूण उत्पन्न रु. २,२२,२२७ झाली. पिकासाठी व्यवस्थापनाचा खर्च रु. ८९,८०० झाला. तो वजा जाता रु. १,३२,८३२ निव्वळ नफा मिळाला.

ही तंत्रे ठरली फायदेशीर

गोकूळ सुलताने सांगतात, की तिसऱ्या वखरणीनंतर तूर पिकाच्या दोन ओळींमध्ये मधोमध वखराच्या जानोळ्याला दोरी गुंडाळून सऱ्या पाडून घेतल्या. यामुळे तूर पीक दाटलेले असताना या दांडातून ओलीत करणे शक्य झाले. पूर्वी असे ओलित करता येत नसे. दांड पाडलेले असल्याने तुरीचे पीक गादीवाफ्यावर आले. पावसाचे अतिरिक्त पाणी नालीमध्ये उतरून जात असल्याने मर रोगाची समस्या फारशी जाणवली नाही.

कंबरेच्या उंचीला तूर आल्यानंतर मशिनद्वारे छाटणी केली. त्याला ६०० रुपये खर्च आला. त्यामुळे फांद्यांची संख्या वाढली. उत्पादकताही वाढली.दोन झाडांतील अंतर मुबलक असल्याने तुरीचे बूड व खोड बळकट झाले. मध्यान्ही सूर्यप्रकाश थेट जमिनीपर्यंत पोहोचू लागला. हवा खेळती राहिली. परिणामी कीड, रोगाचा उपद्रव कमी राहिला. पिकाला खालीपर्यंत एकसमान सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे उत्पादकतेत वाढ होण्यास मदत झाली.

उत्पादनातील तफावत

सलग तुरीचे पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचे कल वाढतो आहे. या पिकाचा मोठा कालावधी लक्षात घेता उत्पादकता वाढीच्या मोठ्या क्षमता आहेत. अन्य शेतकरी तुरीचे एकरी ५ ते ६ क्विंटल कोरडवाहू ) तर ७ ते ८ क्विंटल (ओलिताखाली) मिळवितात. कमी खर्चाच्या व योग्य व्यवस्थापनाच्या माध्यमातून गोकूळ सुलताने यांना एकरी १२.८ क्विंटल तूर उत्पादन मिळाले. एकरी ५ क्विंटल म्हणजेच ६५५१ रुपये दराप्रमाणे ३२,७५५ रुपये उत्पन्न अधिक मिळवणे शक्य झाले. मागील वर्षाप्रमाणे दर मिळाला असता तर नफ्याचे प्रमाण आणखी वाढले असते.

तुरीच्या व्यवस्थापनात कमी खर्चाच्या तंत्रज्ञानासाठी अमरावती येथील श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील तज्ज्ञांची मोबाइलद्वारे मदत घेतली. त्यांच्याशी पेरणीच्या आधीपासूनच संपर्क झाला असता तर दोन ओळींत योग्य अंतर ठेवता आले असते. सुलताने यांचे तुरीचे पीक जास्त दाटल्यामुळे एकसरी आडपाणी द्यावे लागले. पुढील हंगामात दोन ओळींतील अंतर ७ फुटांपर्यंत व दोन झाडांमधील अंतर अर्धा ते पाऊण फूट राखण्याचा विचार आहे. त्यामुळे उत्पादकता नक्की वाढे, असे गोकूळ सुलताने यांनी सांगितले.

गोकूळ सुलताने ९६५७९०३७७३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

SCROLL FOR NEXT