
Parbhani News : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत किंमत आधार योजनेअंतर्गत हमीभावाने (प्रति क्विंटल ७५५० रुपये) तूर विक्रीसाठी पणन महासंघ अंतर्गत ३३ केंद्रांवर ३ हजार ४४२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. गुरुवार (ता.१७) पर्यंत ११ केंद्रांवर ४१५ शेतकऱ्यांची ५ हजार ७३६ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. आजवर २१८ शेतकऱ्यांना २ कोटी ३ लाख ९२ हजार ५५० रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी कुंडलिक शेवाळे यांनी दिली.
परभणी जिल्ह्यात केंद्रीय नोडल एजन्सी नाफेडच्या (राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ) वतीने हमीभावाने तूर खरेदीकरिता राज्य सहकरी पणन महासंघ अंतर्गंतच्या परभणी, पेडगाव, झरी, वरपुड, जिंतूर, बोरी, भोगाव, सेलू, मानवत, रूढीपाटी, पाथरी, देवनांदरा, सोनपेठ, पालम, चाटोरी, पूर्णा, एरंडेश्वर, ताडकळस या १८ केंद्रांवर १ हजार ५६८ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली.
त्यापैकी १ हजार ३१३ शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर तूर घेऊन येण्यासाठी एसएमएस (संदेश) पाठविण्यात आले.गुरुवार (ता.१७)पर्यंत पेडगाव, बोरी, सेलू, रूढी पाटी, देवनांद्रा, एरंडेश्वर या ६ केंद्रावर २९१ शेतकऱ्यांची ३ हजार ४२५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. या तुरीची किंमत २ कोटी ३१ लाख २९ हजार ४२५ रुपये होते.
हिंगोली जिल्ह्यात केंद्रीय नोडल एजन्सी एनसीसीएफच्या (राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ) वतीने तूर खरेदीकरिता राज्य सहकारी पणन महासंघ अंतर्गत हिंगोली, कन्हेरगाव, कळमनुरी, वारंगा, वसमत, जवळा बाजार, येळेगाव, सेनगाव, साखरा, शिवणी खुर्द, फाळेगाव, नागासिनगी, आडगाव, उमरा, पुसेगाव या १५ केंद्रांवर १ हजार ८७४ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली त्यापैकी १ हजार १३५ शेतकऱ्यांना खरेदी केंद्रांवर तूर घेऊन येण्यासाठी एसएमएस (संदेश) पाठविण्यात आले.
गुरुवार (ता. १७) पर्यंत हिंगोली, कनेरगाव, फाळेगाव, सेनगाव, नागसिनगी या ५ केंद्रांवर १२४ शेतकऱ्यांच्या २ हजार ३११ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. या तुरीची किंमत १ कोटी ७४ लाख ५१ हजार ८२५ रुपये होते.
दोन कोटी तीन लाखांवर चुकारे अदा...
परभणी जिल्ह्यात एकूण २ हजार २६१ क्विंटल तूर वखार महामंडळाच्या गोदामात जमा करण्यात आली आहे. पेडगाव, बोरी, सेलू, रूढी पाटी या केंद्रांवर तूर विक्री केलेल्या १९३ शेतकऱ्यांना २ क्विंटल १९७ तुरीचे १ कोटी ६५ लाख ९१ हजार १२५ रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले आहेत.
हिंगोली जिल्ह्यात एकूण १ हजार २७ क्विंटल तूर वखार महामंडळाच्या गोदामात जमा करण्यात आली आहे. कनेरगाव केंद्रावर तूर विक्री केलेल्या २५ शेतकऱ्यांना ५०३ क्विंटल तुरीचे ३८ लाख १ हजार ४२५ रुपये चुकारे अदा करण्यात आले आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.