
Nanded News: परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसीत केलेल्या गोदावरी या तूर वाणाचे शेतकऱ्यांना चांगले उत्पादन येत आहे. गोजेगाव (ता. मुखेड) येथील शेतकरी रामदास माळेगावे यांनी सोयाबीनमध्ये सरीवर आंतरपीक म्हणून घेतलेल्या तुरीपासून एकरी दहा क्विंटल उत्पादन आल्याचे सांगितले आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेला तुरीचा बागायती गोदावरी वाण हा महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना चांगले उत्पादन देणार वाण ठरत आहे. मुखेड तालुक्यातील गोजेगाव येथील रामदास माळेगावे या शेतकऱ्याने दीड एकर सोयाबीनमध्ये आंतरपीक म्हणून तुरीची लागवड रुंद सरी वरंबा पद्धतीने केली.
सोयाबीनच्या आठ तासांनंतर तुरीचे एक तास टोकण यंत्राने लागवड केली. यासाठी दीड एकरात साडेचार किलो बियाणे लागले. उगवणीनंतर दोन पेक्षा अधिक रोपे आली असल्यास त्या ठिकाणी विरळणी करून घेतली.
तण काढण्यासाठी वेळोवेळी आंतरमशागत केली. यंदा पाऊस चांगला असल्यामुळे पिकाची उगवण चांगली झाली. लागवडीनंतर तूर पीक गुंडी अवस्थेत असताना पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी केली.
पीक फुले तसेच शेंगा अवस्थेत जाताना शेंगा पोखरणाऱ्या अळीचा बंदोबस्त करण्यासाठी इमामेटिंन बेंजोएटची फवारणी केली. फवारणीनंतर पीक कोमरा अवस्थेत एक ते दोन वेळा ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिले. अशा व्यवस्थापणामुळे दीड एकरात गोदावरी वाणापासून पंधरा क्विंटल उत्पदन घेतल्याचे रामदास माळेगावे यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.