Amit Shaha Agrowon
ॲग्रो विशेष

Amit Shah Kolhapur : अमित शाह यांच्या दौऱ्यावेळी 'स्वाभिमानी' दाखवणार काळे झेंडे

Sugarcane Kolhapur : महापूर व महागाईमुळे शेतकरी मेटाकुठीस आला आहे. यामुळे मुख्यमंत्री व मुख्य सचिव यांच्या अकार्यक्षमतेचा निषेध करण्यात येणार आहे.

sandeep Shirguppe

Swabhimani Shetkari Sanghatana : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने २०२२-२३ या गळीत हंगामातील तुटलेल्या उसास प्रतिटन ४०० रूपयाचा दुसरा हप्ता मिळावा याकरिता पुणे-बंगळूर महामार्ग रोखून आंदोलन केले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने प्रतिटन १०० रूपयाचा तोडगा काढून आंदोलन स्थगित करण्यात आले.

जवळपास दहा महिने झाले तरीही सरकारकडून या प्रस्तावांना मान्यता न दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फ २५ सप्टेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्यपाल राधाकृष्णन यांच्या दौऱ्यात निदर्शने करून काळे झेंडे दाखविण्यात येणार आहेत.

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी दुसरा हप्ता मान्यतेसाठी साखर आयुक्तांमार्फत गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मुख्य सचिवांकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. आजअखेर जवळपास दहा महिने होवूनही मुख्य सचिवांकडून याबाबत कोणतीच कार्यवाही झाली नाही. याबाबत जवळपास सहावेळा मुख्य सचिव व चार वेळा मुख्यमंत्र्यांना याबाबत समक्ष भेटूनही कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही.

महापूर व महागाईमुळे शेतकरी मेटाकुठीस आला आहे. यामुळे मुख्यमंत्री व मुख्य सचिव यांच्या अकार्यक्षमतेचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राज्यपाल राधाकृष्णन यांच्यासमोर निदर्शने करून काळे झेंडे दाखविण्यात येणार असल्याचे निवेदन स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी काल सायंकाळी(ता.२३) जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Crisis: पिके करपली खरीप अडचणीत

Sugar Stock Verification: साखर साठ्याची संयुक्त तपासणी

Agriculture Department: ‘कृषी’तील आस्थापना सेवांना दिरंगाई नको

September Rainfall: सप्टेंबरमध्येही पाऊस कमीच

Sugar Sales Quota: पंधरवड्यासाठी तेरा लाख टन साखर कोटा निश्‍चित

SCROLL FOR NEXT