PM Narendra Modi : भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था : मोदी

Indian Economy : येत्या काही काळातच भारत हा जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. आमचा देश हा जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे.
PM Narendra Modi
PM Narendra ModiAgrowon
Published on
Updated on

New York News : ‘‘येत्या काही काळातच भारत हा जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. आमचा देश हा जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे.

त्यामुळे आमच्या या विकासगाथेचा अमेरिकेतील तंत्रज्ञान कंपन्यांनी लाभ उठवावा,’’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (ता. २३) केले. मोदी यांनी अमेरिकेतील काही बड्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली.

PM Narendra Modi
PM Narendra Modi : महात्मा गांधींच्या कर्मभूमीतून संकल्पास ऊर्जा मिळते

मोदी म्हणाले, ‘‘अमेरिका, चीन, जर्मनी आणि जपाननंतर भारत हा सध्या जगातील पाचवी अर्थव्यवस्था आहे. ‘जीडीपी’ ३.९ ट्रिलियन डॉलर आहे. सलग तिसऱ्या वर्षी विकासाचा वेग सात टक्क्यांहून अधिक राहिला आहे.

PM Narendra Modi
PM Narendra Modi : हरित हायड्रोजनचा विकास, वापराला गती देण्याची गरज : मोदी

आमच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात भारताला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनविण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहोत.

त्यामुळे सहविकास, सहरचना आणि सहनिर्मिती या माध्यमातून भारताशी सहकार्य व गुंतवणूक करत बड्या कंपन्यांनी आमच्या विकासगाथेचा लाभ उठवावा. भारताच्या आर्थिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीतून अनेक संधी निर्माण होत आहेत.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com