Sustainable Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Sustainable Agriculture: शाश्वत शेती आव्हाने आणि संधी

Entrepreneurs' Opinions: जमीन सुपीकतेसोबत रासायनिक अवशेषमुक्त शेतीमाल उत्पादनासाठी शेतकऱ्यांच्या बरोबरीने निविष्ठा उत्पादकही तितकेच प्रयत्नशील आहेत. तेही काळाची गरज ओळखून पर्यावरणपूरक, नावीन्यपूर्ण निविष्ठा निर्मिती करत आहेत. या उद्योजकांनी शाश्वत शेती आणि आरोग्यदायी अन्नधान्य उत्पादनाबाबत मांडलेली मते...

Team Agrowon

सूक्ष्म सिंचन करेल शेतीला बळकट

निविष्ठांच्या किमती वाढल्या आहेत. पाणी, जमिनीची गुणवत्ता ढासळली आहे. हवामान बदलाचे संकट वाढत आहे. श्रम आणि पैसा ओतूनही शेतकऱ्यांना उत्पादन आणि उत्पन्नाची शाश्‍वती नसते. त्यामुळे देशभर शाश्‍वत शेतीची चर्चा होऊ लागली आहे. त्यामुळेच शेतीमालाला ठरावीक बाजारमूल्य मिळावे, खर्च कमी व्हावा व शेती नैसर्गिक व्हावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. खते, कीडनाशकांचा अतोनात वापर झाल्याने जमिनीचे आरोग्य बिघडले आहे. त्यामुळे सेंद्रिय उपाय उपयुक्त ठरणारे आहेत.

शाश्‍वत शेती रासायनिक अवशेषमुक्त हवी यावर सर्वांचे एकमत आहे. त्यातच मानवापासून ते पशुपक्ष्यांचे भवितव्य दडले आहे. कृषी उद्योगही आपापल्या परीने विविध तंत्र, पद्धती व साधने विकसित करतो आहे. आमची ‘फिनोलेक्स प्लासॉन’ कंपनीही शाश्‍वत शेतीसाठी सिंचन व्यवस्थेला बळकट करण्यासाठी प्रयत्न करते आहे. कमी किंवा जास्त सिंचन थेट पीक उत्पादनावर प्रतिकूल परिणाम करते.

तेलबिया, कडधान्य, तृणधान्ये पावसाच्या पाण्यावर पिकवली जातात. मात्र गरजेपेक्षा जास्त पाणी किंवा खते दिल्याने त्यातून जलप्रदूषणच वाढते. त्यामुळे पिकाच्या पाण्याची गरज ओळखून सूक्ष्म सिंचन करणारी उत्पादने आम्ही आणली आहेत. अनेक राज्यांमध्ये कापूस, सोयाबीन, तूर, कडधान्ये, भात, गहू व अन्य पिकांसाठी आम्ही ठिबक, तुषार प्रणालीसह लागवड तंत्रज्ञान उपलब्ध केले आहे. शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत असल्याचे पाहून आनंद होतो आहे.

सुनील पाटील

(संचालक (विपणन), फिनोलेक्स प्लासॉन इंडस्ट्रीज, पुणे)

मानवासह पर्यावरण स्वास्थ्य महत्त्वाचे

शेती म्हणजे केवळ अन्न पिकवण्याचे साधन नाही. त्यात मानवी स्वास्थ दडले आहे. माती आणि निसर्ग जपण्याची ती जबाबदारीही आहे. त्यामुळे शाश्‍वत शेतीला प्राधान्य देत आमची उत्पादने नावीन्यपूर्ण, पर्यावरणपूरक व रासायनिक अवशेषमुक्त ठेवली आहेत. ‘नोव्हाटेक’ तंत्रज्ञान वापरले असल्याने पिकांना अन्नद्रव्यांचा पुरवठा नियंत्रित पद्धतीने होतो. भूजलाद्वारे नत्राचा ऱ्हास कमी होतो.

त्यामुळे खतांची मात्रा कमी लागते. मातीची सुपीकता टिकून राहते. जमीन व पाण्याचे प्रदूषण कमी होते. ‘रेसिड्यू फ्री’ शेतीसाठी उच्च प्रतीची, दर्जेदार पीक संजीवके, वनस्पती अर्क, सूक्ष्मजीवजन्य बुरशीनाशके व कीटकनाशके उपलब्ध केली आहेत. ‘धनश्री क्रॉप सोल्यूशन्स’कडून सेंद्रिय शेतीसाठी ‘क्विकऑन’ हे नव्या पिढीचे पीक जैवउत्तेजक आणले आहे. सर्व पीक संजीवके सेंद्रिय व शाश्‍वत शेतीसाठी परिणामकारक आहेत. ‘स्लो-रिलीज’ तंत्रज्ञानावर आधारित ‘उत्पादने दीर्घकाळ परिणामकारक ठरणारी आहेत.

एकाच उत्पादनात अनेक सूक्ष्मजीवांचे मिश्रण असलेली उत्पादने हे देखील वैशिष्ट्य आहे. द्राक्षे, डाळिंब, संत्री, केळी, पेरू, कलिंगड, खरबूज, टोमॅटो, वांगी, मिरची, कांदा, कारले, काकडी, ऊस, कापूस, सोयाबीन, मका, आले, हळद, झेंडू, शेवंती, जरबेरा अशा विविध शेतमालांचे उत्पादक आमची उत्पादने वापरत आहेत. ही उत्पादने सुरक्षित व परिणामकारक आहेत. आम्ही शेतकऱ्यांचा ‘आरोहण’ डिजिटल प्लॅटफॉर्म’ विकसित केला आहे.

त्याद्वारे शेतकऱ्यांना नफा-तोट्याचे अहवाल, हवामान अंदाज, बाजारभाव, पीक सल्ला याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येते. याशिवाय ‘आरोहण-बायर’ प्लॅटफॉर्मद्वारे शेतकऱ्यांना आम्ही थेट व्यापाऱ्यांशी जोडण्याचेही काम केले आहे.

डॉ. शरद गुलाबराव बऱ्हाटे

(धनश्री क्रॉप सोल्यूशन्स, पुणे)

सिंचनात आधुनिक तंत्रज्ञानाची गरज

भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा शेती हाच आहे. परंतु अलीकडे अधिक उत्पादनाच्या हव्यासापोटी नैसर्गिक शेती पद्धतीकडे दुर्लक्ष झाले. आज मातीच्या स्वास्थ्यासह मानवाच्या आरोग्यावरही त्याचे प्रतिकूल परिणाम दिसू लागले आहेत. पाणी व्यवस्थापन हा शेतीतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.

त्याच उद्देशाने कोठारी समूहाने ठिबक सिंचन प्रणाली, मायक्रो व मिनी स्प्रिंकलर, स्वयंचलित यंत्रणा (ऑटोमेशन) यासारखी उपकरणे वा तंत्रज्ञान विकसित केले आहे. या प्रणालीमुळे पाण्याचा अचूक वापर शक्य होतो. मुळांच्या कक्षेत अन्नद्रव्यांचा योग्य पुरवठा होतो. शेतमालाच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा होते. ठिबक सिंचन प्रणालीमुळे प्रामुख्याने पाणी व मजुरी याच बचत होतेच. शिवाय खतांचा वापर ३० ते ४० टक्क्यांपर्यंत घटविणे शक्य होते. त्याशिवाय पीसीएएस (PCAS) आणि पीसीएन्डी

(PCND प्रणालीमुळे जमिनीचा पोत सुसंगत राहतो. पीव्हीसी व एचडीपीई ही प्रणाली पाण्याची वाहतूक सुरक्षित व कार्यक्षम करते. तर ‘ऑटोमेशन’ प्रणाली क्षेत्राच्या आकारानुसार एक एकर ते १० हजार एकरांपर्यंत क्षेत्राचे नियंत्रण करते. कंपनीच्या या उत्पादनांचा वापर महाराष्ट्रासह देशभरात ऊस, डाळवर्गीय पिके, फळबागा, भाजीपाल्यांसह अन्य पिकांमध्ये होत आहे.

सध्या कोठारी समूहाने जैविक खते, सेंद्रिय तंत्रज्ञान, ऑटोमेशनमधील नवकल्पनांवर संशोधन सुरू केले आहे. यामध्ये सेंद्रिय खते थेट ठिबकद्वारे देण्याची प्रणाली, माती आरोग्य तपासणी आधारित खत व्यवस्थापन, हवामानानुसार स्मार्ट सल्ला देणारे तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. शेतकऱ्यांचा आर्थिक, सामाजिक व आरोग्यदृष्ट्या संपूर्ण विकास हेच कोठारी समूहाचे ध्येय असून शाश्‍वत शेतीची दिशा दाखवण्याचे कार्य सुरू आहे.

पुष्कराज कोठारी,

(संचालक, इरिगेशन डिव्हिजन ॲण्ड हेड मार्केटिंग कम्युनिकेशन, कोठारी इरिगेशन, सोलापूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT