Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Hail Damage Survey : खानदेशात गारपिटीच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण

Crop Survey : खानदेशात वादळ व गारपिटीत पीक व अन्य नुकसानीसंबंधीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात वादळ व गारपिटीत पीक व अन्य नुकसानीसंबंधीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यात सुमारे २३ हजार हेक्टरवरील पिकांची मोठी हानी झाली आहे. यासंबंधीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे रवाना झाला आहे. भरपाई लवकरात लवकर मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

खानदेशात २६ व २७ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी वादळ व गारपीट झाली. जळगाव जिल्ह्यात २६ व २७ रोजीच्या वादळात १८ हजार हेक्टरवरील पिकांची हानी झाली होती. यानंतर १ मार्च रोजीच्या वादळी पाऊस व गारपीटीत सुमारे एक हजार हेक्टरला फटका बसला. तसेच २९ फेब्रुवारी ते १ मार्च यादरम्यान धुळे व नंदुरबारातही गारपीट, वादळी पाऊस झाला. यात धुळ्यातील शिरपूर, धुळे, साक्री भागात मोठी हानी झाली. नंदुरबारातही नुकसान झाले.

शिरपुरातील कुवे, अर्थे, निमझरी भागात केळी, पपई, मका, गहू, हरभरा या पिकांची मोठी हानी झाली. २६ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत खानदेशात विविध भागात गारपीट, पाऊस झाला. यामुळे हाताशी आलेला घास हिरावला गेला आहे. शिवाय कलिंगड, केळी, पपई या शेतमालेचे दरही खरेदीदारांनी कमी केले आहेत.

केळीची खरेदी सध्या १३०० ते १४०० रुपये प्रतिक्विंटल या दरात केली जात आहे. केळीचे दर १८०० रुपयांपर्यंत होते. कलिंगडाचे दर २३ ते २५ फेब्रुवारीदरम्यान १३ ते १४ रुपये प्रतिकिलो, असे थेट शिवार खरेदीत दिले जात होते. परंतु कलिंगडाचे दरही १० ते ११ रुपये प्रतिकिलो, असे झाले आहेत. पपईचे दरही नऊ ते सात रुपये प्रतिकिलो, असे आहे. जळगावातील चोपडा तालुक्यात चहार्डी, घाडवेल, सनपुले, धनवाडी, गरताड या भागात मोठी पीकहानी झाली आहे. तसेच नंतर माचले, धानोरा, मंगरूळ या भागातही पिकांना मोठा फटका बसला.

मका, ज्वारी, गहू आडवा, कापणीला अडचण अनेक शेतकऱ्यांचे मका, ज्वारी, गव्हाचे पीक आडवे झाले आहे. यामुळे संबंधित पिकांची कापणी, मळणी यासंबंधी अडचणी तयार झाल्या आहे. जमिनीत लोळलेला गहू मोठ्या हार्वेस्टरने मळणी करून घेणे शक्य नाही. शिवाय शेतात ओलावा आहे. वाफसा नाही. ज्वारी, मकाही आडवा झाला आहे.

जो मका, ज्वारी पक्व झालेले नाहीत, त्यात दाणे भरणार नाहीत. किंवा दाणे बारीक पडून पीक उत्पादकतेला मोठा फटका बसेल. आडवे झालेले ज्वारी, मका कापणीसाठी मजूर अधिकची मजुरी मागू लागले आहेत. कारण त्यात अधिकचे श्रम लागतील. त्यात चाऱ्याचेही माती लागून नुकसान होईल, अशी स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CJP Protest: तरुणांच्या आंदोलनाची धग वाढली, देशभरातून पाठिंबा, सरकारकडून चर्चेची तयारी, पण 'सीजेपी'ने ठेवल्या अटी

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, हरभरा आवक स्थिर, टोमॅटो भाव कायम,शेपू दबावातच तर मोसंबी दरात नरमाई

Government Schemes Planning: योजनांच्या लाभासाठी सक्षम प्रकल्प आराखडा महत्त्वाचा : अनिसा महाबळे

Tomato Mar Rog: टोमॅटो पिकातील जिवाणूजन्य मर रोगाची लक्षणे आणि उपाय काय?

Buldhana DCC Bank Election: बुलडाणा जिल्हा बँकेची निवडणूक ठरणार लक्षवेधी

SCROLL FOR NEXT