Agriculture Technology : नाचणी मळणी, सडणीसह प्रक्रिया तंत्रज्ञान केले उपलब्ध

Processing Technology : नाचणीसारख्या पौष्टिक भरडधान्याचे मूल्यवर्धन तंत्रज्ञान पालघर येथील कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) उपलब्ध केले आहे.
Processing Technology
Processing Technology Agrowon

अनुजा दिवटे ९९२०९३५२२३

(विषय विशेषज्ज्ञ, कृषी अभियांत्रिकी) केव्हीके, पालघर

ई-मेल : anujadivate@gmail.com

Ragi Threshing, Rotting Processing Technology : पालघर हा बहुतांश आदिवासी जिल्हा आहे. येथील जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड, तलासरी या तालुक्यांमध्ये डोंगर उतारावर खरिपात बहुतांश सेंद्रिय पद्धतीने नाचणी पीक घेतले जाते. येथील लोक प्रामुख्याने नाचणीचा भाकरी व आंबीलच्या स्वरूपात वापर करतात. ज्वारी, बाजरी ही लोकप्रिय धान्ये असल्याने बाजारात बहुविध मळणी यंत्रे उपलब्ध आहेत.

परंतु नाचणी व अन्य लघू भरडधान्याची मळणी पारंपरिक पद्धतीने म्हणजे काठीच्या साह्याने बडवून केली जाते. त्यानंतर सुपाने वारा देऊन त्यातील धसकटे, काडी कचरा व धान्य वेगळे केले जाते. उखळीचा वापर व पुन्हा सुपाने वारा देऊन धान्य साफ केले जाते. मळणी व सडणी (वरचे टरफल काढणे) अशी ही कामे प्रामुख्याने महिलाच करतात. त्यात शारीरिक कष्ट मोठ्या प्रमाणावर होतात.

प्रक्रियेचे तंत्र रुजवली

पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या पालघर (कोसबाड हिल) येथील कृषी विज्ञान केंद्राच्या (केव्हीके) कृषी अभियांत्रिकी विभागाने ओळखल्या. प्रक्रिया- मूल्यवर्धन तंत्रज्ञानाचा प्रसार केल्यास शेतकरी व महिला बचत गटांचे उत्पन्न वाढून ग्रामीण भागात रोजगार निर्मितीच्या संधी तयार होतील हे जाणले.

शिवाय नाचणीचा आहारात समावेश वाढून कुटुंबाची पोषणसुरक्षा वाढेल हे लक्षात घेतले. त्यादृष्टीने यंत्रे उपलब्ध करून केव्हीकेचे प्रक्षेत्र व शेतकऱ्यांच्या शेतावर चाचण्या घेतल्या.

नाचणी मळणी, सडणी तंत्रज्ञान

केव्हीकेने दोन मळणी, सडणी यंत्रे उपलब्ध केली. त्यातील पहिले आहे उत्तराखंड येथील विवेकानंद पर्वतीय कृषी संशोधन संस्थेने विकसित केलेले विवेक मिलेट थ्रेशर-कम-पर्लर. (नागली झोडणी व सडणी यंत्र). दुसरे यंत्र आहे दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेले. -पहिल्या यंत्रात मळणी व सडणी ही कामे दोन टप्प्यांत, तर दुसऱ्या यंत्रात दोन्ही कामे एकाचवेळी होतात. पहिल्या यंत्राची किंमत तीस हजार, तर दुसऱ्या यंत्राची किंमत ४५ हजार रुपये आहे. दोन्ही यंत्रे विजेवर चालतात. त्यांना ०.७४६ ते दीड किलोवॉट विजेची गरज असते.

यांत्रिकी मळणीमुळे वेळ, ऊर्जा वाचते. शेतकऱ्यांचे कष्ट कमी होतात. उत्पादनाची गुणवत्ता सुधारते.

केव्हीकेने आदिवासी उपयोजना अंतर्गत सात नाचणी मळणी व सडणी यंत्रे शेतकऱ्यांना पुरवली आहेत.

Processing Technology
Paddy and Ragi Registration : भात व नाचणी विक्रीसाठी शेतकरी नोंदणीस मुदतवाढ

यांत्रिक मळणीची वैशिष्ट्ये, फायदे

विविध लघू भरड धान्यांची मळणी एकाच यंत्राद्वारे शक्य. उच्च क्षमतेचे यंत्र. पेंढा, भुसा, धान्य वेगवेगळे होतात. कष्ट कमी होतात.

वापरण्यास सुलभ, कमी देखभाल.

झोडणीसाठी शेतात खळे करण्याची गरज नाही. खडे, माती, बियाणे यासोबत एकत्र होत नाही.

कमी वजनाचे असल्याने एका शेतातून दुसऱ्या शेतात नेण्यास सुलभ.

अखंड पेंढा वापरण्यास मिळतो.

बेकरी युनिट प्रक्रिया

केव्हीकेत २०२२ मध्ये भरड धान्य आधारित प्राथमिक प्रक्रिया आणि बेकरी युनिट प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली. त्याद्वारे नाचणीपासून बिस्किटे, केक, खारी, ब्रेड, टोस्ट, नाचणी सत्त्व, रवा, बहूधान्य पीठ, डोसा, इडली पीठ, ढोकळा पीठ, पोहे, लाह्या, नूडल्स (व्हर्मीसेली), पास्ता, कुरकुरे, कुरडई, लाडू, गुलाबजाम, बर्फी असे विविध पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येते.

ज्वारी, बाजरी, सावा, राळा आदी धान्यांपासूनही पदार्थ निर्मिती तंत्रज्ञान प्रशिक्षण सोय आहे. पदार्थांची विक्रीही केंद्रामार्फत होते. महिला बचत गट व शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर येथील प्रक्रिया यंत्रे उपलब्ध करून दिली जातात. आत्तापर्यंत १२०० हून अधिक विद्यार्थी, महिला बचत गट सदस्या, शेतकरी व उद्योजक यांनी या युनिटला भेट देऊन मूल्यवर्धन तंत्रज्ञानाची माहिती घेतली आहे.

केव्हीकेचा सन्मान

हैदराबाद येथील प्रसिद्ध क्रिडा या संस्थेत २०२२ येथे भरडधान्यांविषयी आंतरराष्ट्रीय परिषद झाली. त्यात नाचणीतील काढणीपश्‍चात यांत्रिकीकरण, त्यायोगे महिलांचे कष्ट हलके करणे याविषयी केव्हीके, पालघर यांच्या वतीने सादरीकरण करण्यात आले. त्यात उत्कृष्ट सादरीकरणाचा पुरस्कार केव्हीकेने पटकावला.

Processing Technology
Agriculture Technology : मशागतीसाठी दुचाकीच्या जुगाडातून शोधला स्वस्त पर्याय
आमच्या बचत गटामार्फत नाचणी पापड, लाडू, सत्त्व, चकली, शेव, वडे, पीठ आदी पदार्थांची विक्री होते. नाचणी पापडांना जास्त मागणी आहे. पूर्वी खुल्या वातावरणात उन्हात वाळवत असल्याने अनेक समस्या होत्या, केव्हीकेने ‘पिरॅमिड’ आकाराचे सौरऊर्जा वाळवणी तंत्रज्ञान (ड्रायर) व संमतीप्राप्त ‘पॅकेजिंग, ‘लेबलिंग’ तंत्रज्ञान प्रशिक्षण दिले. ड्रायरच्या वापरामुळे वेळेत बचत झाली. प्रक्रिया सुकर होऊन स्वच्छता प्राप्त झाली. या यंत्रात १५० ते २०० पापड मावतात. गुणवत्तेत सुधारणा झाल्याने दर चांगला मिळू लागला आहे. प्रक्रियेतून चांगली आर्थिक उलाढाल करणे शक्य झाले आहे.
मीरा महाले, सचिव, राधाकृष्ण स्वयंसाह्यता महिला बचत गट, देहेरे, ता. जव्हार
आम्ही बारवी ॲग्रो शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना तीन वर्षांपूर्वी केली. नाचणी, ज्वारी आणि बाजरीपासून सत्त्व, लाडू, बिस्किटे, केक, लाह्या निर्मितीचे प्रशिक्षण केव्हीके, कोसबाड येथे घेतले. आता १० प्रकारचे प्रक्रियायुक्त पदार्थ बाजारात उपलब्ध केले असून, ऑनलाइन व प्रदर्शनांच्या माध्यमातूनही विक्री करतो. वार्षिक उलाढाल ८ ते ९ लाख होते. -=
अमृता योगेश व्हावळ, संचालिका, बारवी शेतकरी उत्पादक कंपनी, करवेळे, ता. मुरबाड, जि. ठाणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com