Sunflower Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Sunflower Cultivation : खानदेशात सूर्यफुलाची पेरणी सुरूच

Sunflower Farming : कमी कालावधी व बऱ्यापैकी दर देणारे पीक म्हणून खानदेशात यंदा सूर्यफुलाची पेरणी सुमारे १८०० हेक्टरवर झाली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : कमी कालावधी व बऱ्यापैकी दर देणारे पीक म्हणून खानदेशात यंदा सूर्यफुलाची पेरणी सुमारे १८०० हेक्टरवर झाली आहे. गेले चार-पाच वर्षे अपवाद वगळता पेरणी होत नव्हती. यंदा पेरणी तीन हजार हेक्टरपेक्षा अधिक होईल, असे संकेत आहेत.

कापूस पिकात गुलाबी बोंड अळीने धुमाकूळ घातला. त्यात मका पिकालाही लष्करी अळीने विळखा घातला. मका पीक खर्चिक झाले आहे. तसेच गहू पिकाला अधिकचे पाणी द्यावे लागते. तर बाजरी, कांदा पिकात दरांची शाश्वती नाही. बाजरीला यंदा फक्त १८०० ते २१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

अशा स्थितीत धुळ्यातील शिरपूर, जळगावमधील यावल, चोपडा, जामनेर या भागात काही शेतकरी सूर्यफुलाकडे वळले आहेत. सूर्यफूल पेरणीत जळगाव, धुळे जिल्हे १० ते १५ वर्षांपूर्वी आघाडीवर होते. परंतु कमी दर व इतर कारणांमुळे पेरणी कमी झाली. मध्यंतरी सूर्यफूल पेरणीची नोंदही नव्हती.

परंतु अलीकडे आलेले चांगले वाण, दरांची हमी, सिंचनाची गहू, मक्याच्या तुलनेत कमी गरज व कमी खर्च यामुळे सूर्यफूल पेरणीला बरा प्रतिसाद दिसत आहे. पेरणी धुळ्यातील शिरपुरमध्ये २०० हेक्टरवर आहे.

तसेच जळगावमधील चोपडा, यावल, जामनेरात मिळून १५०० हेक्टर क्षेत्र आहे. इतर भागांतही पेरणी झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी आगाप पेरणी केली. मळणीनंतर ओल्या सूर्यफूल पिकास १० हजार रुपये दर मिळण्याची स्थिती सध्या आहे. एकरी किमान ४० ते ४५ हजार रुपये नफा सुटेल, असे चित्र सध्या आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertiliser Subsidy: आर्थिक संकटाची चाहूल?; खत अनुदानाचा भार ७० हजार कोटींनी वाढणार, देशात किती खत साठा शिल्लक?

Pusad APMC: बाजार समितीच्या काट्यावरच शेतकऱ्यांची ‘काटछाट’

Low Fertilizer Farming: कमी खतांमध्ये चांगले उत्पादन कसे घेता येते?

Kharif Crop Planning: पुसद तालुक्यात ७५ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

Watermelon Sales Decline: टरबूज विक्रीवर मुंबईतील घटनेचे सावट

SCROLL FOR NEXT