Agriculture Department: खरीप हंगाम तोंडावर आला असून पुसद तालुक्यात यंदा सुमारे ७५ हजार हेक्टरवर पेरणी होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. कपाशीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता असून, सोयाबीनच्या क्षेत्रात काहीशी घट अपेक्षिAgrowoत आहे. कृषी विभागाने तयार केलेल्या २०२६-२७ च्या खरीप आराखड्यानुसार सर्वाधिक ३१ हजार ८९० हेक्टरवर कपाशीची लागवड प्रस्तावित आहे..कृषी विभागाच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, पुसद तालुक्यात सोयाबीनची लागवड २८ हजार ९१० हेक्टरवर होण्याचा अंदाज आहे. याशिवाय तूर ८ हजार ११०, हळद १ हजार ८९०, खरीप ज्वारी ६१०, मुग ४४५ तर उडीद ३५० हेक्टरवर क्षेत्रावर राहण्याचा अंदाज आहे..Kharif Crop Planning: खरिपात पाऊस कमी? योग्य नियोजनाने शाश्वत उत्पादन शक्य.तालुक्यात एकूण ३९ हजार ७६८ शेतकरी खातेदार आहेत. त्यामध्ये १६ हजार २२९ अत्यल्प भूधारक, ९ हजार ६९० अल्पभूधारक तर १३ हजार ८३९ बहुभूधारक शेतकऱ्यांचा समावेश आहे. यंदाच्या हंगामासाठी तालुक्यात १ लाख ५९ हजार ४५० कपाशी बियाण्यांच्या पाकिटांची आवश्यकता भासणार आहे. .Kharif Micro Planning: खरिपासाठी सूक्ष्म नियोजन करावे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील.तसेच ८ हजार ६७३ क्विंटल सोयाबीन बियाण्यांची गरज असून, शेतकऱ्यांकडे सध्या २८ हजार २१० क्विंटल घरगुती सोयाबीन बियाणे उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. खतांच्या मागणी संदर्भातील माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की पुसद तालुक्याला खरीप हंगामात एकूण २२ हजार ८६३ मेट्रिक टन खतांची आवश्यकता राहते. त्यानुसार ९ हजार ५०९ टन मिश्र खत, ५ हजार ८०२ टन युरिया, २ हजार ३०४ टन डीएपी तर ४ हजार २६६ टन एसएसपी खताची मागणी नोंदविण्यात आली आहे..बीजप्रक्रियेशिवाय पेरणी नको !मंडळ कृषी अधिकारी तथा प्रभारी गुणनियंत्रण अधिकारी अमोल आघाव यांनी, मागील काही वर्षांपासून जमिनीत बुरशीजन्य रोगांचे प्रमाण वाढत असल्याने बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करू नये, असे सांगितले. तसेच किमान १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई टाळावी, असे आवाहनही त्यांनी केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.