Team Agrowon
उन्हाळी सूर्यफूल लागवडीसाठी मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. आम्लयुक्त आणि पाणथळ जमिनीत लागवड करू नये.
उन्हाळी सूर्यफुलाची पेरणी फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात करावी.
मध्यम खोल जमिनीत ४५ बाय ३० सेंमी व भारी जमिनीत ६० बाय ३० सेंमी अंतरावर पेरणी
करावी.
संकरित आणि जास्त कालावधीच्या वाणांची ६० बाय ३० सेंमी अंतरावर पेरणी करावी.
पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी. म्हणजे बियाणे व खत एकाच वेळी पेरता येते.
बियाणे ५ सेमी पेक्षा जास्त खोल पेरू नये.
बागायती पिकाची लागवड सरी वरंब्यावर टोकण पद्धतीने करावी.
पेरणीसाठी सुधारित वाण : फुले भास्कर, भानू, एस एस ५६ हे वाण निवडावेत तर संकरित वाणापैकी केबीएसएच ४४, फुले रविराज, एमएसएफएच १७ यापैकी एका वाणाची निवड करावी.
Vegetable Grafting : भाजीपाला पिकातील कलम तंत्राचे फायदे ओळखा उत्पादन वाढवा