Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Groundnut Sowing : दौंड तालुक्यात उन्हाळी भुईमूग पेरणीला वेग

Groundnut Cultivation : दौंड तालुक्यात उन्हाळी भुईमूग पिकाच्या पेरण्यांना वेग आला आहे. तर काही शेतकऱ्यांनी उसात भुईमुगाची आंतरपीक म्हणून टोकन केली आहे.

Team Agrowon

Pune News : दौंड तालुक्यात उन्हाळी भुईमूग पिकाच्या पेरण्यांना वेग आला आहे. तर काही शेतकऱ्यांनी उसात भुईमुगाची आंतरपीक म्हणून टोकन केली आहे. देऊळगाव राजे व परिसरात सुमारे १०० व्हेक्टरमध्ये लागवड होणार आहे.

तालुक्यात १५ जानेवारीपासून शेतकरी भुईमूग पिकांची लागवड सुरू करतात. परंतु पेरणीला मात्र ऊस तुटून गेल्यावर वेग येत आहे. शेतकरी सुरू व खोडव्याची शेती मोकळी झाल्यानंतर भुईमुगाची पेरणी करीत आहेत.

तर काही शेतकरी भुईमुगाची हाताने टोकन करताना दिसत आहे. पेरणीसाठी एकरी ४० ते ५० किलो बियाण्याचा वापर होत आहे. भुसभुशीत, मध्यम निचरा होणारी,चुना व सेंद्रिय पदार्थ योग्य प्रमाणात असणारी जमीन शेतकऱ्याकडून निवडली जाते.

सुधारित बियाणे (वाण)

* टीयेजी २४

* फुले उन्नती

* जेएल १०८५

पेरणी कालावधी

उन्हाळी..........१५ जाने ते १५ फेब्रुवारी

पावसाळी .......... १५ जून ते १५ जुलै

अशी करा बीजप्रक्रिया

१. प्रतिकिलो बियाण्यास ४ ग्राम ट्रायकोडर्मा चोळावे.

२. २५ ग्राम रायझोबियम व २५ पीएसबी जिवाणूची बीजप्रक्रिया करावी.

खतमात्रा व्यवस्थापन :

१. १०:२०:०० नत्र स्फुरद पालाश

२. प्रति हेक्टरी २२ किलो युरिया व १२५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट

३. ५० ते ६० दिवसांनी २ टक्के १९:१९:१९ विद्राव्य खताची फवारणी करावी.

असे करा रोग व कडी नियंत्रण

तांबेरा व टिक्का रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास फ्लूबेनडायमाईड ३.५ टक्के + हेक्साकोंन्याझोल ५% डब्लू जी ५० ग्रॅम (प्रति पंप) फुलकिडे, तुडतुडे,ना ग अळी साठी कविनोल्फोसची फवारणी करावी.

अपेक्षित उत्पादन..............१४ ते १६ क्विंटल प्रतिएकर

सध्याचा बाजारभाव..............प्रतिक्विंटल ५००० ते ६०००

कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेले तंत्रज्ञानाने भुईमूग पिकाची लागवड केली पाहिजे. यासाठी ट्रॅक्टर चलीत पेरणी अवजार किंवा मनुष्यचलित टोकन यंत्र वापरावे. ७५ टक्के उगवण दिसल्यानंतर लगेच नंग्या भरून घ्याव्यात. यामुळे उत्पादनात वाढ होते.
- शिवाजी कदम, कृषी सहाय्यक देऊळगाव राजे
उन्हाळी हंगामातील भुईमूग लागवडीसाठी टीयेजी २४ व कादरी लेपक्षी जातीचे बियाणे (ग्राम बीज उत्पादन या उद्देशाने) महाबीज अंतर्गत अनुदानात खरेदी विक्री संघ देऊळगाव राजे व केडगाव या शाखेमध्ये उपलब्ध आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा.
- राहुल माने, तालुका कृषी अधिकारी दौंड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT