Summer Groundnut Sowing : साताऱ्यात ७९ टक्के क्षेत्रावर उन्हाळी भुईमुगाची पेरणी

Groundnut Cultivation : जिल्ह्यात उन्हाळी हंगामातील पेरणी, टोकणीच्या कामांना वेग आला आहे. जिल्ह्यात दोन हजार २६८ हेक्‍टर म्हणजेच ४७.६० टक्के क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे.
Summer Groundnut Cultivation
Groundnut Sowing Agrowon
Published on
Updated on

Satara News : जिल्ह्यात उन्हाळी हंगामातील पेरणी, टोकणीच्या कामांना वेग आला आहे. जिल्ह्यात दोन हजार २६८ हेक्‍टर म्हणजेच ४७.६० टक्के क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. यामध्ये उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी झाली आहे. फलटण तालुक्‍यात सर्वाधिक ५६० हेक्‍टर क्षेत्रावर उन्हाळी पेरणी झाली असल्याची नोंद झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

कृषी विभागाकडून जिल्ह्यात चार हजार ८०४ हेक्‍टर क्षेत्र उन्हाळी पिकांच्या पेरणीसाठी नियोजित करण्यात आले होते. त्यापैकी दोन हजार २६८ हेक्‍टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे.

Summer Groundnut Cultivation
Summer Groundnut Farming: उन्हाळी भुईमूग पिकातील कीड व्यवस्थापन: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे मार्गदर्शन

यामध्ये उन्हाळी भुईमुगाची २१३८ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील माण, खटाव, कोरेगाव, खंडाळा व फलटण या तालुक्‍यांत तीव्र दुष्काळी तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने पाण्याची उपलब्धतता आहे.

यामुळे उन्हाळी पिके घेण्याकडे कल वाढला आहे. पश्चिमेकडील तालुक्यात खरीप हंगामात अतिपाऊस तसेच दसरा, दिवाळी सणास पैसे देणारे पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. खरिपात भुईमुगाची जागा सोयाबीनने घेतल्याने भुईमुगाचे क्षेत्र घटले आहे. यामुळे भुईमुगाचे उन्हाळी पीक घेतले जात आहे.

Summer Groundnut Cultivation
Groundnut Cultivation : मोखाड्यात २५० एकरवर भुईमुग लागवड ; रोजगारासाठी आदीवासींचे स्थलांतर घटण्यास मदत

जिल्ह्यात सध्या भुईमुगाच्या पिकाची पेरणी व टोकणीची कामे सुरू आहेत. जिल्ह्यात भुईमुगाचे २६९९ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून यापैकी २१६८ हेक्टरवर भुईमुगाची लागवड झाली आहे. तसेच मका व उन्हाळी सोयाबीनची लागवड झाली आहे. मात्र या पिकांच्या नगण्य क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

तालुकानिहाय उन्हाळी पेरणी झालेली क्षेत्र (हेक्‍टरमध्ये) ः

सातारा ७१.७७

जावळी ६२.४२

पाटण ४७.३५

कराड १०२.१७

कोरेगाव ४२.४०

खटाव २१.६४

माण ३०.७७

फलटण ४४.२०

खंडाळा ६५.६८

वाई ४९.१२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com