Groundnut Cultivation : मोखाड्यात २५० एकरवर भुईमुग लागवड ; रोजगारासाठी आदीवासींचे स्थलांतर घटण्यास मदत

Groundnut Crop : आदिवासी शेतकरीसुद्धा आधुनिक पद्धतीने शेती करू शकतो. याचे उदाहरण भोयेपाडा, मोर्हाडा येथील शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमूग लागवडीद्वारे सिद्ध करून दाखविले आहे.
Groundnut Cultivation
Groundnut CultivationAgrowon
Published on
Updated on

Groundnut Production : मोखाडा ः तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी इच्छाशक्ती, जिद्द आणि प्रामाणिकपणे शेती क्षेत्रात योग्य दिशेने प्रयत्न केले आहेत. आदिवासी शेतकरीसुद्धा आधुनिक पद्धतीने शेती करू शकतो. याचे उदाहरण भोयेपाडा, मोर्हाडा येथील शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमूग लागवडीद्वारे सिद्ध करून दाखविले आहे. त्यामुळे आदिवासी कुटुंबांना आर्थिक उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला आहे. त्यांचे स्थलांतर काही अंशी थांबले आहे.

तालुक्यातील भोयेपाडा, तुळ्याचा पाडा, मोर्हाडा हे गाव टेकड्यांनी वेढलेले आहे. प्रगतिशील शेतीसाठी येथे प्रतिकूल परिस्थिती आहे. गरीब परिस्थितीमुळे बहुसंख्य शेतकरी खरिपात भात, नागली, वरई, उडीद, खुरासणीसह इतर पिके घेतात. खरीप हंगामानंतर रोजगार मिळविण्यासाठी बहुसंख्य बेरोजगार तरुण, शेतकरी मुंबई, नाशिक येथे जातात.

Groundnut Cultivation
Groundnut Cultivation : उन्हाळी भुईमुग लागवडीची योग्य पद्धत

या गावानजीक नदीच्या परिसरातील शेतकरी खरिपानंतर १० ते १५ गुंठे क्षेत्रात मिरची लागवड जवळच असलेल्या धरणाच्या पाण्यावर करत असे. बाकीचे सर्व क्षेत्र ओसाड राहत होते, मात्र मिरचीच्या भावातील चढउतारामुळे पीक परवडत नसे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले.
पालघर कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ भरत कुशारे यांनी भातपिकानंतर भुईमुगाचा पर्यायी पीक म्हणून लागवडीचा मार्ग दाखविला. त्यांनी शेतकऱ्यांना एकत्र करून भुईमूग लागवडीचे इक्रीसॅट तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेऊन शेतकऱ्यांनी लागवडीला सुरुवात केली. २०१५ या पहिल्या वर्षी पाच एकर भुईमूग लागवड केली. चांगले उत्पादन आल्याने २०१६-१७ पासून ४० एकर क्षेत्रावर लागवड केली.

इक्रीसॅट तंत्रज्ञान कसे वापरावे?
इक्रीसॅट पद्धतीत प्रामुख्याने लागवडीसाठी रुंद वरंबा आणि सरी पद्धत (गादी वाफा) वापरली. वरंब्याच्या दोन्ही बाजूला १५ सेंमी रुंदीच्या सऱ्या पाडाव्यात. वरंब्याची उंची १५ सेंमी ठेवावी. अशाप्रकारे वरंब्याच्या वरील भाग ७५ सेंमी गादीवाफा तयार होतो. बियाण्याची ३० बाय १० सेंमी अंतरावर टोकन करून लागवड केली. स्प्रिंकलर अथवा ड्रीप वापरल्यास ९० सेंमी गादीवाफा ठेवता येतो.

भुईमूग लागवडीचे शेतकऱ्यांसाठी फायदे
ड्रीप सिंचन वापराने उत्पादन वाढण्यासाठी मदत.
नवीन पिकामुळे कीड व रोगांचे प्रमाण अत्यल्प.
भात, भुईमुगामुळे जमिनीचा
पोत सुधारण्यासाठी मदत.
भुईमुगाचा पाला
जनावरांसाठी चारा.
११० ते ११५ दिवसांच्या
उन्हाळी हंगामात रोजगार.
पर्यायी नगदी पिकाने
कुटुंबाची आर्थिक घडी मजबूत.
घरगुती वापरासाठी
तेलाचा प्रश्न सुटला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com