Sugarcane Season  agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : यंदाच्या ऊस गळीत हंगामात ११७ कारखान्यांनी ५८६ कोटींची एफआरपी थकवली

Sugarcane FRP : ८५ कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी अदा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे.

sandeep Shirguppe

Sugarcane FRP Maharashtra : कोल्हापूर विभाग वगळता राज्यात १ नोव्हेंबरपासून उसाचा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू झाला. दरम्यान राज्यात सहकारी आणि खासगी अशा २०२ साखर कारखान्यांनी आतापर्यंत ४४१.०२ लाख टन उसाचे गाळप केले आहे.

यामध्ये ८५ कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी अदा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. तर ११७ कारखान्यांची चालू हंगामाची एफआरपी थकीत अद्याप दिली नाही.

राज्यात तुटून गेलेल्या उसाची एफआरपी रक्कम १३ हजार ६४२ कोटी रुपये होते. यापैकी १३ हजार ५६ कोटीची एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. तर अद्यापही अनेक साखर कारखान्यांमधील ५८६ कोटींची रक्कम थकीत आहे. दरम्यान थकीत असलेल्या साखर कारखान्यांनी यादी समोर आली नाही.

राज्यातील ८५ कारखान्यांनी ठरलेल्या दराप्रमाणे एफआरपी अदा केली आहे तर ५० कारखान्यांनी ६० ते ७० टक्के रक्कम अदा केली आहे. ११७ कारखान्यांची चालू हंगामातील एफआरपी थकीत आहे. दरम्यान यंदा कारखान्यांकडे ऊसतोड मजुरांटी कमतरता असल्याने कित्येक ठिकाणी उसतोडीसाठी शेतकरी कारखानदारांकडे विनंत्या करत आहेत.

सहकारी साखर कारखान्यांची अडचण

शेतकरी संघटनांच्या आंदोलनामुळे कारखाने उशिरा सुरू झाले आहेत. त्यातच ऊस क्षेत्रही घटल्याने साखर कारखाने उसाची पळवापळवी करत आहेत. दरम्यान गाळप झालेल्या उसाची एफआरपी वेळेत अदा केली तरच विश्वासार्हता राहणार आहे.

खासगी कारखाने व्यावसायिकता जोपासत आर्थिक देणी वेळोवेळी अदा करत आहेत; तर बहुतांश सहकारी कारखान्यांचे आर्थिक गणित बिघडल्याने कर्मचारी पगार, व्यापारी देणी प्रलंबित आहेत. त्यामुळे हा हंगाम शक्यतो सहकारी कारखान्यांना आर्थिक कसरतीचा असणार आहे. कारण बहुतांश सहकारी कारखान्यांवरच मोठा कर्जाचा न पेलणारा बोजा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना दोन हप्ते एकदम?; मार्च, एप्रिलचा ७३० कोटी निधी मंजूर

Soybean Seed Treatment: कमी पावसाच्या संकटात सोयाबीन लागवडीपूर्वीचे नियोजन कसे करावे?

Papaya Cultivation: पपई लागवड क्षेत्र १५ हजार हेक्टरवर पोहोचण्याचा अंदाज

Agrowon Podcast: कापसातील तेजी कायम; सोयाबीनमध्ये सुधारणा, कांदा दबावातच तर हळद-हरभरा स्थिर

Water Levels Drop: उन्हामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट

SCROLL FOR NEXT