Kolhapur Shetkari Sangh : कर्जात बुडालेला संघ वाचणार का?, संभासदांनी नेत्यांना दिल्या कानपिचक्या

Shetkari Sangh Election : शेतकरी संघाच्या मतदानावेळी सभासदांनी नेत्यांना चिठ्ठ्यांमधून कोल्हापुरी हिसका दाखवला आहे.
Shetkari Sangh Kolhapur
Shetkari Sangh KolhapurAgrowon
Published on
Updated on

Kolhapur Agriculture News : कर्जात बुडालेल्या शेतकरी सहकारी संघाला वाचविण्यासाठी एकत्र आलेल्या सर्वपक्षीय नेत्यांनी शेतकरी संघांवर एकहाती सत्ता मिळवली. शेतकरी संघ सध्या कर्जासोबत भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडल्याने संपण्याच्या मार्गावर आहे. संघासह सभासदांना वाचवण्यासाठी जिल्ह्यातील नेते मंडळी काय निर्णय घेणार हे येणारा काळच ठरवणार आहे. दरम्यान संघाच्या मतदानावेळी सभासदांनी नेत्यांना चिठ्ठ्यांमधून कोल्हापुरी हिसका दाखवला आहे.

'शेतकरी सहकारी संघ वाचविण्यासाठी म्हणून का असेना सर्वपक्षीय नेते एकत्र आले. जिल्ह्यात शांतता राहील. तरीही, संघ वाचला तर ठीक, नाहीतर तुम्ही सर्वांनीच राजकारणातून संन्यास घेतला पाहिजे,' 'गोकुळ, जिल्हा बँक, बाजार समितीत सोयीची भूमिका घेऊन नेते लोकांना मूर्ख बनवत आहेत, तसेच, 'संघाची प्रगती करा, नाहीतर शिल्लक राहिलेली जागा तुमच्या नावावर करून घेशिला. या जागांसाठीच तुम्ही एकत्र आला आहात का," असा प्रश्न पडत असल्याचा टोला सभासदांनी मतपेटीत चिठ्ठया टाकून लगावला आहे.

संघासाठी एकत्र आलेल्या सर्वपक्षीय नेत्यांनी आणि उमेदवारांनी संघाकडे प्रत्येकी पत्रास-पन्नास लाख रुपये ठेव ठेवावी आणि संघाला गतवैभव मिळवून द्यावे, असे आवाहनही चिठ्ठयांतून केले आहे. 'सतेज पाटील यांनी निष्ठावंतांना डावलू नये, कानामागून आला आणि तिखट झाला, असे होऊ नये, 'चंद्रदीप नरके, सर्वपक्षीय नेते हे जेंव्हा तुमची गरज असते. त्यावेळी तुम्हाला ते जवळ करतात. त्यामुळे योग्यवेळी तुमची ताकद दाखवून दिली पाहिजे,' असे आवाहनही चिठ्ठयांतून केले आहे.

तर अन्य चिठ्ठयांमधून 'शेतकरी संघाला वाचविण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते झोपेतून जागे झाले आहेत. हा आनंदी-आनंद आहे. या नेत्यांनी आता शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचे थकीत प्रोत्साहनात्मक अनुदान तत्काळ देण्यासाठी प्रयत्न करावेत.' सतेज पाटील यांनी नव्या लोकांना उमेदवारी देऊन चांगले काम केले. तर, कोरे यांनी दिलेल्या उमदेवारांपैकी एकाने संघाच्या जागा विक्री प्रकरणी पुढाकार घेतला होता, असे मत सभासदांनी व्यक्त केले आहे. यावरून नेत्यांनी यातून काही तरी धडा घ्यावा, अशीही अपेक्षा व्यक्त केली आहे.

Shetkari Sangh Kolhapur
Shetkari Sangh Kolhapur : शेतकरी संघावर जिल्ह्यातील सर्वच नेत्यांची सत्ता, अडीच तासात निकाल स्पष्ट

सभासदांचे सल्ले ...

भ्रष्टाचार करणाऱ्या कामगारांवर कडक कारवाई करा. • शेतकरी संघाच्या बसलेल्या बैलाला उठवा, नाहीतर मारून टाकशिला.

# सर्वपक्षीयांच्या प्रत्येक नेत्याने आणि उमेदवारांनी संघाकडे पन्नास लाख रुपयांच्या ठेवी ठेवून संघाला गतवैभव मिळवून द्यावे.

कार्यकर्ते डोकी फोडून घेतात नेते गळ्यात गळे घालून भ्रष्टाचारासाठी एकत्र येतात.

आपण सगळे भाऊ-भाऊ जनतेला खुळ्यात काढून सगळं वाटून खाऊ....

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com