Sugarcane Production : खोडवा ऊस उत्पादनात अनिकेत बावकर राज्यात पहिले

Success Story of Farmer : पुणे जिल्ह्यातील मुळशीच्या भातपट्ट्यात उसाच्या खोडव्याचे हेक्टरी २९१.८१ टन (एकरी सुमारे ११६ टन) उत्पादन मिळवून राज्यात पहिला क्रमांक मिळवण्यात अनिकेत बावकर यांनी यश मिळवले आहे.
Aniket Bavkar
Aniket BavkarAgrowon
Published on
Updated on

Sugarcane Farming : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुका हा भातपट्टा म्हणून प्रसिद्ध आहे. तालुक्यातील कासारसाई येथील हनुमंत बावकर यांची नऊ एकर शेती आहे. मागील चार- पाच वर्षांपासून त्यांचे सुमारे २७ वर्षे वयाचे युवा चिरंजीव अनिकेत शेती पाहताहेत.

त्यांचे ‘बीसीए’पर्यंत शिक्षण झाले आहे. तंत्रज्ञानाची कास धरत शेतात नवे प्रयोग व सुधारणा करण्यावर त्यांचा भर आहे. वडिलांचे त्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळते.

भाषणाने दाखवली सुधारित शेतीची वाट

भात, कांदा याचबरोबर बावकर कुटुंबाचे ऊस हे देखील मुख्य पीक आहे. अनिकेत यांनी शेतीचा अनुभव घेण्यास सुरुवात केली त्या वेळी उसाचे एकरी उत्पादन ४० ते ५० टनांपर्यंत होते. सभासद असलेल्या श्री संत तुकाराम सहकारी कारखान्यात एकेदिवशी अनिकेत व्याख्यान ऐकण्यासाठी गेले होते. त्या वेळी सांगली जिल्ह्यातील प्रयोगशील ऊस उत्पादक संजीव माने यांच्या मार्गदर्शनपर भाषणाचा त्यांच्यावर परिणाम झाला.

त्यातून प्रेरणा घेत लाट वाटेने जाऊन आपण ऊसशेतीत प्रगती करायचे असे त्यांनी ठरविले. त्यानुसार माने तसेच संशोधन केंद्र, संस्थांकडूनही मार्गदर्शन ते घेऊ लागले. त्यातून ऊस व्यवस्थापन सुधारण्यास व एकरी उत्पादन वाढण्यास मदत मिळाली. आज लागवडीच्या उसाची एकरी ६० पासून ते ८० टन उत्पादकता त्यांनी गाठली आहे. मातीचे आरोग्य जपण्यावरही लक्ष दिले आहे. लागवडीच्या उसाचा उत्पादन खर्च एकरी ८० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत आहे. कारखान्याकडून प्रति टन दोन हजार ८३५ रुपये दर मिळतो.

Aniket Bavkar
Sugarcane Season : पुणे विभागात एक कोटी २१ लाख टन ऊसाचे गाळप

खोडवा उसात राज्यात प्रथम

मागील वर्षीच्या खोडवा उसाचे हेक्टरी २९१. ८१ टन म्हणजे एकरी सुमारे ११६ टन उत्पादन मिळवून राज्यात पहिला क्रमांक मिळवण्यात अनिकेत यांना यश मिळाले आहे. अडीच एकर प्लॉटमध्ये फुले २६५ हे वाण होते.

या कौतुकास्पद कामगिरीसाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे २०२२- २३ या वर्षासाठी ऊसभूषण हा पुरस्कार देऊन अनिकेत यांना सन्मानित करण्यात आले आहे. सन २००९- १० मध्ये त्यांच्या वडिलांनाही कृषिनिष्ठ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

Aniket Bavkar
Sugarcane Production : 'भविष्य ओळखून साखर कारखान्यांनी साखरेबरोबर पर्यायी मार्ग स्विकारावे'

ऊस व्यवस्थापनातील ठळक बाबी

जमीन काळी, लालसर असून दरवर्षी ५ ते ६ एकर ऊस असतो. उसाला फेरपालट म्हणून कांदा घेण्यात येतो.

पूर्वी साडेतीन फूट सरी पद्धतीची लागवड होती. आता चार फुटी सरीचा वापर होतो. रोपे लावून किंवा एक डोळा पद्धतीनेही लागवड होते. रुंद सरीमुळे रोपांची चांगली वाढ होते. जमिनीचा प्रकार पाहून दोन रोपांमधील अंतर सव्वा ते दोन फुटांपर्यंत ठेवले जाते. मुरमाड जमिनीत अंतर जास्त तर काळ्या जमिनीत काहीसे कमी ठेवले जाते.

केवळ उत्पादनवाढ नव्हे तर मातीची सुपीकता हा देखील घटक महत्त्वाचा असतो. ही बाब लक्षात घेतली. उन्हाळ्यामध्ये जमिनीची उभी आडवी नांगरट होते.

तीन प्रकारच्या सेंद्रिय खतांचा वापर होतो. यात लेअर कोंबडीखत अडीच एकरांला १९ ते २० टन असा वापर केला आहे. कारखान्याकडील कंपोस्ट खताचा तेवढ्याच क्षेत्राला ४० ते ४५ टन वापर केला आहे. तर एकरी सात ट्रॉली शेणखत वापरले आहे. याच खतांमध्ये रासायनिक खताचा बेसल डोस मिसळून ते शेताला दिले जाते.

दरवर्षी ताग, धैंचा आदी हिरवळीच्या पिकांची लागवड उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात ऊस लागवडीपूर्वी होते. दोन ते अडीच महिन्यांनंतर हे पीक शेतात गाडले जाते.

हरभरा पीक घेऊन त्याचे उत्पादन न घेता ते देखील जमिनीत गाडले जाते. त्यातून नत्र उपलब्ध होतो.

जमिनीची सुपीकता वाढविण्याच्या उद्देशाने दरवर्षी उसाच्या पाचटाची कुट्टी करून त्याचा वापर होतो.

दोन ट्रॅक्टर्स व त्यावर चालणारी अवजारे आहेत.

वाढीसाठी गरजेनुसार संजीवकांच्या फवारण्या केल्या जातात.

फुले २६५ या वाणासह व्हीएसआय १८१२१ तसेच को ८००५ या वाणाचेही प्रयोग केले आहेत.

जिवामृताचा वापर

२०० लिटर पाणी, १० किलो शेण, पाच लिटर गोमूत्र, दोन किलो गूळ, वडाच्या झाडाखालील माती. दोन किलो पीठ असे मिश्रण तयार करून जिवामृत तयार केले जाते. ते सात दिवस बॅरेलमध्ये ठेवून सतत ढवळत ठेवले जाते. त्यानंतर त्यातून १० लिटर काढून त्याचे प्रति २०० लिटर पाणी व दोन किलो गूळ असे मिश्रण तयार केले जाते. ते दर आठवडा किंवा १५ दिवस यानुसार उसाला दिले जाते. गीर व साहिवाल अशा दोन देशी गायी व दोन कालवडी आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com