Paddy Subsidy Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Subsidy : धान उत्पादक शेतकऱ्यांना १० हजार रुपये अनुदान द्या; सुधीर मुंगटीवार यांची राज्य सरकारवर टिका

Farmers Welfare : राज्याचे मदत आणि पुनवर्सन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय घेऊ आणि धान उत्पादकांना मदत देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली. यावेळी राज्य सरकारच्या कारभारावर मुंगटीवार यांनी जोरदार टिका केली. त्यामुळे सरकारच्या कारभारातील सावळागोंधळ चर्चेचा विषय ठरला.

Dhananjay Sanap

Sudhir Mungatiwar : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत देता मग धान उत्पादकांना का नाही, प्रस्ताव नाकाणारे अधिकाऱ्यांमधील आधुनिक वाल्मीक कराड कोण आहे, याचा शोध घ्या असं म्हणत आमदार सुधीर मुंगटीवार यांनी गुरुवारी (ता.६) सरकारवर जोरदार टिकास्त्र चालवलं.

त्यावर राज्याचे मदत आणि पुनवर्सन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय घेऊ आणि धान उत्पादकांना मदत देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली. यावेळी राज्य सरकारच्या कारभारावर मुंगटीवार यांनी जोरदार टिका केली. त्यामुळे सरकारच्या कारभारातील सावळागोंधळ चर्चेचा विषय ठरला.

लष्करी अळीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालं. परंतु पंचनामे न केल्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. त्यावेळी निवडणूक होती. तसेच पिकाची काढणी झाली होती. राज्य सरकारला प्रस्ताव देऊनही अधिकाऱ्यांनी ते मंजूर केले नाहीत. त्यामुळे राज्य सरकार धान उत्पादकांना प्रति हेक्टरी १० हजार रुपये मदत देणार का, असा प्रश्न आमदार सुधीर मुंगटीवार यांनी उपस्थित केला.

राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी टोलवाटोलवीचं उत्तर दिलं. त्यावरून सुधीर मुंगटीवार यांनी ज्येष्ठ आमदार म्हणून एक सल्ला देतो म्हणत जयस्वाल यांना सचिवांची उत्तर देऊ नका, असा टोला लगावला. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानावरून विधिमंडळात आमदार आणि मंत्र्यांमध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं.

चंद्रपुर जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्यांचं ३७ हजार हेक्टरवर लष्करी अळीनं नुकसान झालं. त्यामुळे १७ नोव्हेंबर २०२४ रोजी राज्य सरकारला प्रस्ताव पाठवण्यात आले. परंतु त्यावेळी निवडणूक होती. त्यामुळे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले नाहीत. मात्र विभागीय आयुक्तांकडून प्रस्ताव पाठवल्यानंतरही मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी ते नाकारले. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही.

आता १० हजार रुपये प्रति हेक्टरी अनुदान धान उत्पादकांना देण्याची मागणी मुंगटीवार यांनी केली. परंतु त्यावर ठोस उत्तर न देता मंत्री जयस्वाल यांनी पीकविम्यातून भरपाई मिळते, म्हणत वेळ मारून नेली.

यावर मुंगटीवार यांनी मात्र मी पिच्छा सोडणार नाही, अशी भूमिका जाहीर केली. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी मंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे तर निर्णय होईल, असं म्हणत मुंगटीवार यांचं समाधान करण्याचा प्रयत्न केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bank Note Exchange: जिल्हा बँकांच्या नोटाबदलीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पडून

PM DhanDhanaya Yojana: ‘पीएम धनधान्य कृषी योजने’ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Maize Production: जागतिक पातळीवर विक्रमी मका उत्पादन?

Maharashtra Rain Alert: विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा

Crop Insurance Scam: विमा कंपन्यांकडून अधिकाऱ्यांना घोटाळ्यासाठी कमिशन; एसआयटी चौकशीची आमदार धसांनी केली मागणी

SCROLL FOR NEXT