Unseanaol Rain : अवकाळी पावसाचा धान-मका उत्पादकांना फटका

Rain Update : गोंदिया जिल्ह्यात ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. गेल्या आठवडाभरापासून पाऊस, गारपीट होत व वादळी वारे वाहत असल्याने पीक नुकसान व घरांची पडझड झाली.
Unseasonal Rain
Unseasonal RainAgrowon

Gondiya Weather News : गोंदिया जिल्ह्यात ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. गेल्या आठवडाभरापासून पाऊस, गारपीट होत व वादळी वारे वाहत असल्याने पीक नुकसान व घरांची पडझड झाली. त्याची दखल घेत नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केली आहे.

जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनातून ही मागणी करण्यात आली आहे.

निवेदनानुसार, या वर्षी गोंदिया जिल्ह्यासह अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी उन्हाळी धानासह मका लागवड केली आहे. हाताशी आलेले पीक अवकाळी पावसामुळे वाहून गेले असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

Unseasonal Rain
Unseasonal Rain : नगर जिल्ह्यात महिनाभरात वादळी पावसामुळे नऊ बळी

संपूर्ण जिल्ह्यात गारपीट, विजेच्या कडकडाटासह वादळी, मुसळधार पाऊस पडत आहे. त्याचा सर्वाधिक फटका धान व मका पिकाला बसला आहे. अशात झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बडोले यांनी केली आहे.

यावर शेतकऱ्यांना शासनस्तरावरून शेतकऱ्यांना यथोचित मदत करण्यात येईल, असे आश्‍वासन जिल्हाधिकारी गोतमारे यांनी दिले.

निवेदन देतेवेळी जिल्हा परिषद बांधकाम सभापती संजय टेंभरे, देवरी पंचायत समिती सभापती अंबिका बंजार, अर्जुनी मोरगाव पंचायत समिती उपसभापती होमराज पुस्तोडे, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकला डोंगरवार, निशा तोडासे, रूपाली टेंभुर्णे, शालिनी डोंगरे, जितेश गौतम, उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com