Paddy Bonus : धान उत्पादकांच्या बोनसचा सरकारला विसर

Paddy Farming : आधारभूत खरेदी केंद्रावर धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती हेक्‍टर वीस हजार रुपये बोनस देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र या संदर्भातील शासन आदेश अद्यापही निघाला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे.
Paddy Bonus
Paddy BonusAgrowon
Published on
Updated on

Gondiya News : गोंदिया ः आधारभूत खरेदी केंद्रावर धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती हेक्‍टर वीस हजार रुपये बोनस देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र या संदर्भातील शासन आदेश अद्यापही निघाला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे.

धान शेतीच्या लागवड खर्चात सातत्याने वाढ होत असल्याने धान शेती आतबट्टयाची ठरत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शासनाकडून धान उत्पादकांना प्रोत्साहन म्हणून दर वर्षीच्या हंगामात आधारभूत किमतीच्या जोडीला बोनस दिला जातो. गेल्या तीन वर्षांपूर्वी धानाला प्रति क्‍विंटल बोनस देण्याचा प्रघात होता.

Paddy Bonus
Paddy Bonus : धान बोनसपासून शेतकरी वंचित

आता मात्र क्‍विंटलऐवजी प्रति हेक्‍टर बोनस दिला जात आहे. यंदा नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रति हेक्‍टरी वीस हजार रुपये याप्रमाणे बोनसची घोषणा केली.

या घोषणेला दोन महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी लोटला असताना अद्यापही त्यासंबंधीचा आदेश निघाला नाही. परिणामी शेतकऱ्यांमध्ये शासनाच्या भूमिकेविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.

दीड लाख शेतकरी पात्र
हमीभावाने धान विक्रीसाठी शेतकऱ्यांना आगाऊ नोंदणी करणे क्रमप्राप्त ठरते. जिल्हयात सुमारे १ लाख ५० हजार ६३ शेतकऱ्यांनी धान विक्रीकरिता नोंदणी केली होती. हेच शेतकरी बोनससाठी पात्र ठरले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com