Sindhudurg News: घाटमाथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे करूळ घाटात गुरुवारी (ता. ४) दरड कोसळली. त्यामुळे तळेरे-कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. दरम्यान, घाटरस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दोन जेसीबी आणि ब्रेकरच्या साह्याने दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. .दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव हा घाटमार्ग १२ सप्टेंबरपर्यंत वाहतुकीस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. घाट परिसराला बुधवारी सायंकाळी आणि गुरुवारी सकाळी मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले..Uttarakhand Landslide: उत्तराखंडमध्ये पुन्हा प्रकोप .या परिसरातून वाहणाऱ्या सर्व नद्या दुथडी भरून वाहत होत्या. दरम्यान, दगडमातीच्या मोठ्या भरावाने संपूर्ण रस्ता व्यापला. साधारणपणे रस्त्याच्या ५० ते ६० मीटर अंतरावर दरड पसरली होती. दरडीमध्ये मोठ्या दगडाचा समावेश आहे..त्यामुळे तळेरे-कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. गणेशोत्सवाला आलेले अनेक गणेशभक्त कोल्हापूर मार्गे मुंबईकडे जात होते. या सर्वांना माघारी परतावे लागले..Landslide Risk: दोन गावांतील ८०० जीव दरडीच्या छायेत.पोलिसांनी या महामार्गावरील वाहतूक भुईबावडा मार्गे तर अवजड वाहतूक फोंडाघाट मार्गे वळविली. गुरुवारी दिवसभर दोन जेसीबीच्या साह्याने दरड हटविण्याचे काम सुरू होते. परंतु दरडीमध्ये मोठ्या दगडांचा समावेश होता..हे दगड जेसीबीने हटविता येत नव्हते. त्यामुळे ब्रेकरच्या साह्याने दगड फोडून ते हटविले जात आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत हे काम सुरू होते. त्यानंतर शुक्रवारी देखील दरड हटविण्याचे काम सुरू आहे. .वैभववाडी तहसीलदार सूर्यकांत पाटील, पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. दरड कोसळण्याचा धोका अजूनही आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हाधिकाऱ्यांनी हा घाटमार्ग १२ सप्टेंबरपर्यंत वाहतुकीस बंद ठेवण्याचे आदेश महामार्ग प्राधिकरणाला दिले आहेत. तज्ज्ञांचे पथक घाटरस्त्यांची पाहणी करणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.