Devrav Shrirang Chaudhary Agrowon
ॲग्रो विशेष

Success Story : डोंगरमाळ, खाचखळग्यातून धावतोय शेतकरीपुत्र देव

Team Agrowon

दिनकर गुल्हाने

Kaas Ultra Marathon : नाव देवराव श्रीरंग चौधरी. धावणारा देव अशी त्याची ओळख. पुसदच्या श्रीरामपूर मधील रहिवासी. शेतकऱ्याचा मुलगा. वयाच्या २७ व्या वर्षी उंच डोंगर, खडकाळ जमीन तुडवत देव दक्षिण आफ्रिकेच्या डर्बन सिटीत धावला आणि ९७ वर्षांच्या इतिहासात कॉम्रेड मॅरेथॉन जिंकून तो ‘फास्टेस्ट इंडियन’ बनला. ही बाब पुसदच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी ठरली आहे.

‘द अल्टिमेट ह्यूमन रेस’ या नावाने ओळखली जाणारी ही अल्ट्रा मॅरेथॉन जगातील सर्वात जुनी व खडतर स्पर्धा आहे. देवने या स्पर्धेतील ८६ किलोमीटर अंतर सात तास चार मिनिटांत पार केले आणि तो रौप्य पदकाचा मानकरी ठरला.

हा बहुमान पटकावणारा देव वयाच्या अठराव्या वर्षांपासून विविध स्पर्धेत धावत आहे. पोलिस भरतीसाठी धावणारे युवक पाहून देवला प्रेरणा मिळाली. आतापर्यंत त्याने १०, २१, ४२ किलोमीटर मॅरेथॉन अशा एकूण ७० स्पर्धांत धावण्याची गती कायम ठेवली आहे.

‘हेन्नूर बांबू अल्ट्रा - २०२२’ या बेंगलोरमध्ये झालेल्या १६१ किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत तो सतत १८ तास २४ मिनिटे धावला. त्याचा हा रेकॉर्ड अद्याप कुणीही पार करू शकलेले नाही. ‘इंडियन बॅकयार्ड अल्ट्रा मॅरेथॉन’ त्याने सतत तीन वर्षे गाजवली.

दिल्ली येथे झालेल्या ‘इंडियन बिग डॉग बॅक यार्ड अल्ट्रा’ या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी त्याने भारतीय चमूचे प्रतिनिधित्व केले. डोंगर, चढाव, खाचखळगे पार करत अंधाऱ्या रात्रीही देव न थकता धावला.

पुणे येथे झालेल्या ‘जम्पिंग गोरिला माउंटन ट्रेल’ या मॅरेथॉनमध्ये सिंहगड परिसरात तो रात्रंदिवस १२० किलोमीटर धावला व पहिला विजेता ठरला. नुकतीच त्याने ‘कास अल्ट्रा’ ही ६५ किलोमीटरची मॅरेथॉन पाच तास ३८ मिनिटांत पार केली. त्याला आता नॅशनल रेकॉर्ड ब्रेक करायचे आहे.

देवचा दिवस धावण्याने सुरू होतो. तो दररोज किमान २५ किलोमीटर धावतो. त्यासह स्वीमिंग, जिम आदी व्यायाम प्रकार करतो. आईच्या हातचे जेवण हाच त्याला उत्तम आहार वाटतो. धावण्यासाठी महिन्याला किमान २५ हजार रुपये किमतीचे शूज देवला घ्यावे लागतात. खर्च झेपत नसल्याने चाहते मदत करतात. धावण्याला पाठिंबा मिळेल, अशा ठिकाणी त्याला काम करण्याची इच्छा आहे.

कुठलेही क्षेत्र विचारपूर्वक निवडा. त्यावर फोकस करा. लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही बेस्ट काय देऊ शकता याकडे फोकस हवा.
देवराव चौधरी, धावपटू

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना मिळाले ९६ कोटींचे अर्थसाह्य

Soybean Cotton Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना २६५ कोटींवर अर्थसाह्य देय

MSP Procurement : ‘पणन’कडून तेरा ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रे सुरू होणार

Fruit Crop Insurance : आंबा, काजू उत्पादकांना तातडीने विमा मिळावा

Soybean Cotton Subsidy : लातूरला १५१, तर धाराशिवला १४१ कोटींचे वाटप

SCROLL FOR NEXT