Dubai Success Story : वाळवंटातील संपन्न आनंदवन : दुबई

Dubai Country : दुबईच्या दौऱ्यात ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली. निसर्गाची प्रतिकूलता असताना प्रगती कशी साधावी, त्यासाठी योग्य मार्गाची निवड कशी करावी, याचा दुबई हा आदर्श वस्तुपाठ आहे.
Dubai Agriculture
Dubai AgricultureAgrowon

डॉ. राजेंद्र सरकाळे

United Arab Emirates : दुबई हे संयुक्त अरब अमिरातीमधील अत्यंत श्रीमंत व समृद्ध शहर आहे. वाळवंटाने व्यापलेला भाग व निसर्गाची प्रतिकूलता असली तरी दुबई शहर तेल उत्पादनामुळे महत्त्वाचे व्यापारी केंद्र बनले आहे. दुबई हे संयुक्त अरब अमिरातीमधील सर्वाधिक लोकसंख्येचे, मध्य आशियामधील महत्त्वाचे आणि जगातील २२ व्या क्रमांकाचे महागडे शहर आहे.

जगाच्या नकाशावर उद्योगधंदे, व्यवसाय व पर्यटनामुळे दुबई हे प्रमुख शहर म्हणून उदयास आले आहे. अजूनही या ठिकाणी राजामार्फत राज्यकारभार चालविला जातो. हे शहर पर्शियन आखाताच्या आग्नेय किनाऱ्यावर अरबी या विस्तीर्ण वाळवंटामध्ये समुद्रसपाटीलगत वसलेले आहे. दुबई शहराची लोकसंख्या सुमारे २४ लाख असून, साक्षरतेचे प्रमाण ९८.१३ टक्के आहे. येथे मानवाधिकाराचे कसोशीने पालन केले जाते.

शहर खूपच स्वच्छ असून, रस्ते प्रशस्त आहेत. अरबी ही दुबईमधील राष्ट्रीय भाषा असून, दैनंदिन वापरासाठी इंग्लिश या दुसऱ्या भाषेचा वापर केला जातो. शहराचे हवामान अत्यंत उष्ण असून उन्हाळ्यात येथील सरासरी कमाल तापमान ४१ अंश, हिवाळ्यात किमान तापमान १४ अंश एवढे असते. वार्षिक पर्जन्यमान प्रतिवर्षी ९४ ते ९६ मिलिमीटरच्या आसपास असते. शहरात रस्त्यांचे विस्तृत जाळे व एक प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ यासह अत्याधुनिक वाहतूक व्यवस्था आहेत.

भाजीपाला, फळांचे मार्केट

देशांतर्गत कृषी उत्पादन अत्यंत कमी असल्याने भारत, बांगलादेश किंवा इतर आशियायी देश तसेच युरोपीय देशांतून भाजीपाला व फळांची मोठ्या प्रमाणावर आयात केली जाते. आयात केलेल्या भाजीपाल्यावर दुबई ट्रेड सेंटरमध्ये आवश्यक चाचण्या केल्या जातात. त्यानंतर माल विक्रीसाठी पाठविला जातो.

दुबई हे भाजीपाला व फळबाजाराची घाऊक बाजारपेठ आहे. या ठिकाणी व्यापारी आणि विक्रेते घाऊक किमतीत मोठ्या प्रमाणावर माल खरेदी करतात. त्यानंतर स्थानिक किराणा दुकान, बाजार, रेस्टॉरंट आणि इतर व्यावसायिकांना वितरण करतात. बाजार सकाळी लवकर सुरू होतो. कारण खरेदीदारांना दिवस सुरू होण्यापूर्वी ताजा माल दुकानात उपलब्ध असणे आवश्यक असते. काही प्रमाणात मालाची जास्त मागणी किंवा मर्यादित माल उपलब्धता, दर्जा, प्रमाण आणि बाजारपेठेतील मागणी यास अनुसरून व्यापारी हे पुरवठादारांशी किमतीबाबत वाटाघाटी करतात.

Dubai Agriculture
Vegetable Farming Success Story : भाजीपाला पिकांनी उंचावले दानापूरचे अर्थकारण

बाजारात ताज्या उत्पादनाची गुणवत्ता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उत्पादन विशिष्ट मानांकनाची पूर्तता करते की नाही याची खात्री करण्यासाठी बाजार अधिकारी किंवा व्यवस्थापक पाहणी करतात. या ठिकाणी निरीक्षक भाज्यांसह अन्न उत्पादनांची गुणवत्ता व सुरक्षितता यावर लक्ष ठेवून असतो. उत्पादनांवर माशा, चिलटे फिरत असल्यास अशा विक्रेत्यांच्या उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घातली जाते.

आयात केलेल्या भाज्यांसाठी आयातदाराला आवश्यक परवाने, अन्नसुरक्षा, लेबलिंग आणि दस्तऐवज अशा अटींची पूर्तता करणे आवश्यक असते. आयात केलेल्या व स्थानिक पातळीवर उत्पादित केलेल्या भाज्यांची नियमित तपासणी केली जाते. विविध बॅचनुसार नमुने गोळा करून विश्लेषणासाठी मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये पाठविले जातात. या ठिकाणी चाचणीमध्ये कीटकनाशकांचे अवशेष, दूषित पदार्थ, सूक्ष्मजीवांमुळे भाज्या दूषित होणे व इतर गुणवत्तेचे मापदंड तपासले जातात. माल खराब होऊ नये म्हणून वाहतूक, साठवणूक व वितरण या साखळीत योग्य तापमान नियंत्रण मानकांचे पालन केले जाते.

बाजारपेठेत भाज्यांची गुणवत्ता तपासल्यानंतरच दुबईमध्ये वितरण व विक्रीस मान्यता दिली जाते. या ठिकाणी ग्राहकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली जाते.

फळे व फुले बाहेरच्या देशातून आयात केली जातात. दुबईतील खरेदीदार प्रामुख्याने हॉलंड, केनिया, दक्षिण आफ्रिकेतून फुले आयात करतात. आकर्षक पॅकिंग करून फुले युरोप, मलेशिया, सिंगापूर, मध्य आशियातील देशांकडे विक्रीसाठी पाठविली जातात. दुबईत सध्या फुलांच्या व्यवसायात ब्लॅक टूलीफ आणि अल लोकरीत या दोन मोठ्या कंपन्या कार्यरत आहेत.

दुबई फ्लॉवर सेंटरमध्ये केनिया, हॉलंडमधून आर्किड, कार्नेशन, बर्ड ऑफ पॅराडाईज, शेवंती या फुलांची आयात केली जाते. कंपन्यांनी फुलांच्या हाताळणी आणि साठवणुकीसाठी शीतगृहे बांधली आहेत. हॉलंड व इतर देशांतून आयात होणारी फुले दुबईतील किरकोळ विक्रेत्यांकडे मागणीप्रमाणे विक्रीस पाठविली जातात. आयात केलेल्या फुलांची पुन्हा प्रतवारी करून युरोपात निर्यात केली जाते.

येथील कंपन्यांनी फुलांसाठी शीतगृहे, प्रतवारी केंद्र, पॅकिंगगृह उभारले आहे. फुलांचे आकर्षक पॅकिंग करून फुले शीतगृहामध्ये ठेवली जातात. परदेशातील मागणीनुसार फुले निर्यात केली जातात. फुलांमध्ये प्रामुख्याने अँथुरियम, ऑर्किड, जरबेरा, कार्नेशन, गुलाब, शेवंती आणि ग्लॅडिओलस तसेच सुशोभीकरणासाठी लागणारी पाने (फिलर्स), जिप्सोफिलाची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते.

Dubai Agriculture
Agriculture Success Story : माळरानाचे पालटले चित्र...

मटण आणि माशांची बाजारपेठ

डेरा फिश मार्केटमध्ये मासे खरेदी व विक्रीच्या प्रक्रियेत सामान्यतः काही चाचण्या पूर्ण कराव्या लागतात. मच्छीमार आणि पुरवठादार विविध मासे उपलब्ध करून देतात.

मासळी बाजारात थेट मच्छिमारांद्वारे किंवा वितरण साखळीद्वारे मासळी उपलब्ध करून दिली जाते. माशांचा ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी बर्फ किंवा रेफ्रिजरेटेड डिस्प्ले वापरले जातात. या बाजारात मासे, कोळंबी, खेकडे यासह विविध प्रकारचे मासे खरेदी करता येतात. खरेदीदारांमध्ये ग्राहक, किरकोळ विक्रेते, रेस्टॉरंट, घाऊक विक्रेते यांचा समावेश असतो.

खजूर लागवड

दुबईचा बहुतांश परिसर वाळवंटी असल्यामुळे या ठिकाणी पीक लागवड अत्यल्प आहे. त्यामुळे दुबईला भाजीपाला, अन्नधान्य, खाद्यपदार्थ, दुग्धजन्य पदार्थांसाठी आयातीवरच अवलंबून राहावे लागते. हीच भारतीयांना चांगली संधी आहे. जगात अरब राष्ट्र आणि उत्तर आफ्रिकेतील देशांमध्ये खजुराची लागवड केली जाते. इजिप्त, सौदी अरेबिया, अल्जीरिया, स्पेन, इटली, चीन, इराण, इराक, पाकिस्तान येथील वाळवंटी प्रदेशात याची लागवड केली जाते. खजूर झाडाचे सरासरी आयुष्य ८० ते १०० वर्षांचे असते. बरही, खनेजी, झामली, अजवाह, सगई, शिशी, सुलताना, लुलू, खद्रावी, अजबराह, नबुत, शेफ, नागल फर्द अशा खजुराच्या जाती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लोकप्रिय आहेत. आपल्या देशात सर्वाधिक खजूर आयात केला जाते. आपला देश दरवर्षी सुमारे ३ लाख मेट्रिक टन खजूर आयात करतो.

अरब राष्ट्रांत खजुरासाठी असणारे अनुकूल वातावरण आणि जमीन यामुळे या देशातील खजुराचा दर्जा सर्वोत्तम समजला जातो. खजुरात मोठ्या प्रमाणात असणारी प्रथिने व खनिजे तसेच फॅटचे कमी प्रमाण आणि ६० टक्क्यापर्यंत असलेली साखर या शक्तिवर्धक गुणधर्मामुळे खजूर खाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

खजूर लागवडीला अनुकूल वातावरण असल्यामुळे दुबईमध्ये सरकारच्या मदतीने खजुराची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. दुबई सरकारने काही वर्षांपूर्वी २० लाख खजुराच्या रोपांची लागवड केली. बिस्किटे, केक, टॉफी, डेट पेस्ट, डेट शुगर, व्हिनेगार, चटणी-लोणचे, डेट सिरप व अल्कोहोल बनविण्यासाठीही त्याचा वापर केला जातो. खजुराच्या झाडाच्या पानाचा वापर चटई, बुट्टी आणि दोर बनविण्यासाठी केला जातो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com