अरे लोकप्रतिनिधींनी कसे वागले पाहिजे हे ठरवले पाहिजे, शिंदेंनी त्यांच्या दोन आमदारांना सुनावलेसंतोष बांगर यांनी मतदान केंद्रात मोबाईल नेत व्हिडिओ चित्रित केल्याचा प्रकार उघडकीस संजय गायकवाड यांच्या मुलाने बोगस मतदान करणाऱ्या व्यक्तीला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप.Eknath Shinde reaction on MLA Santosh Bangar controversy: ''अरे लोकप्रतिनिधींनी आपण कसे वागले पाहिजे हे ठरवले पाहिजे. निवडणूक प्रक्रिया लोकशाही मार्गाने झाली पाहिजे, असे आमचे मत आहे.'' अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या आमदारांचे कान टोचले आहेत. आमदार संतोष बांगर यांच्यावर तसेच संजय गायकवाड यांच्या मुलावर गुन्हा नोंद झाल्यानंतर शिंदे यांनी, त्यांच्या आमदारांना जबाबदारीने वागण्याचा सल्ला दिला आहे..कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी काल मंगळवारी नगरपरिषद निवडणुकीदरम्यान (Maharashtra Election 2025) मतदान केंद्रात मोबाईल नेत व्हिडिओ चित्रित केल्याचा प्रकार उघडकीस आला. तसेच शिंदेंच्या शिवेसेनेचे आणखी एक आमदार संजय गायकवाड यांच्या मुलाने बोगस मतदान करणाऱ्या व्यक्तीला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दोन्ही आमदारांना सुनावले आहे..Maharashtra Politics: निवडणूक आयोग इतके दिवस झोपला होता का? .आमदार संतोष बांगर मतदान केंद्रात मोबाईल घेऊन गेले होते. एक महिला मतदार मतदान करत असताना ते, इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा, असे सांगत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. ते ईव्हीएम मशीनकडे डोकावून पाहात महिला मतदाराला कोणते बटन दाबायचे हे सांगत असल्याचे व्हिडिओत दिसते. तसेच त्यांनी ईव्हीएमवर मतदान केल्यानंतर त्याचा मोबाईलवरुन व्हिडिओ शूट केला. यामुळे ते वादात सापडले आहेत. या प्रकरणी बांगर यांच्यावर हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. .Maharashtra Elections: २६४ नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी मतदान संपले, अनेक ठिकाणी बोगस मतदानावरून राडा, २१ तारखेला निकाल.तसेच बुलढाणा नगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान मंगळवारी शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याला बोगस मतदान करत असताना पकडले होते. त्याला रंगेहाथ पकडल्यानंतर चोपही दिला होता. पण याचदरम्यान शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा आणि उमेदवार कुणाल गायकवाड यांनी बोगस मतदान करणाऱ्या व्यक्तीला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी भाजपकडून निवडणूक आयुक्तांकडे तक्रार केली आहे. या प्रकरणी कुणाल गायकवाड आणि त्यांच्या एका नातेवाईकावर बुलढाणा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.