डॉ. सुयोग खोसे, वैभव सूर्यवंशीकापूस पऱ्हाटीचा भुसा जमिनीत गाडल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब आणि इतर पोषणद्रव्ये हळूहळू उपलब्ध होतात. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील उच्च सामू असलेल्या जमिनीत पऱ्हाटीचा भुगा गाडल्याने सामू संतुलित होतो. सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. भुगा नैसर्गिक आच्छादनाप्रमाणे कार्य करून जमिनीचे तापमान नियंत्रित ठेवतो, पाणी धारणक्षमता वाढवतो. .नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान कापूस काढणी पूर्ण होताच, शेतकरी पुढील रब्बी किंवा उन्हाळी हंगामासाठी शेत तयार करण्याच्या गडबडीत असतो. मजुरांची टंचाई आणि वेळेची निकड यामुळे अनेक जण कापसाची उभी पऱ्हाटी जाळून टाकण्याचा सोपा मार्ग स्वीकारतात. हा उपाय क्षणिक सोयीचा वाटला, तरी तो जमिनीच्या आरोग्यास, उत्पादनक्षमतेस आणि पर्यावरणाला दीर्घकालीन हानी पोहोचवतो. कापूस काढणीनंतर शेतात उरलेली पऱ्हाटी ही मोठी अडचण ठरते. विदर्भ आणि मराठवाड्यात दरवर्षी लाखो टन पऱ्हाटी तयार होते. पारंपरिक पद्धतीने ही पऱ्हाटी जाळल्याने शेत त्वरित मोकळे होते, परंतु त्याचवेळी जमिनीतील सूक्ष्मजीव नष्ट होतात, सेंद्रिय पदार्थांची पातळी घटते, कार्बन डाय ऑक्साइडसह इतर प्रदूषक वायू वातावरणात मिसळतात. परिणामी, हवामान बदलाची गती वाढते. शेतकऱ्यांना दीर्घकाळात आर्थिक तोटा सहन करावा लागतो..Cotton Mulching : साडेसातशे हेक्टरमध्ये मल्चिंगवर कपाशी.पऱ्हाटी जाळण्याचे परिणामपऱ्हाटी जाळल्यामुळे जमिनीच्या नैसर्गिक गुणधर्मांवर आणि पर्यावरणावर अपरिवर्तनीय दुष्परिणाम होतात. हे परिणाम केवळ तात्कालिक नसून, ते शेतीच्या दीर्घकालीन आर्थिक व्यवहार्यतेवर गंभीर ताण निर्माण करतात..जमीन आरोग्य आणि पोषणमूल्यांवर परिणामवाळलेल्या पऱ्हाटीमध्ये अंदाजे ५१ टक्के कार्बन, ०.६२ ते १ टक्का नत्र, ०.०८ ते ०.१ टक्का स्फुरद आणि ०.६१ ते ०.६८ टक्का पालाश असतो. पऱ्हाटी जाळल्यामुळे यातील नत्र नष्ट होऊन हवेत मिसळते. कार्बनचे प्रमाण ९० टक्क्यांहून अधिक कमी होते, ज्यामुळे जमिनीच्या सेंद्रिय कर्बाची पातळी मोठ्या प्रमाणात खालावते.पऱ्हाटी जाळणे म्हणजे एका पिकासाठी मोफत उपलब्ध असलेले मौल्यवान खत नष्ट करून, त्याच पोषणद्रव्यांची पूर्तता पुढील हंगामात महागड्या रासायनिक खतांनी करण्याची दुहेरी आर्थिक चूक आहे. पऱ्हाटीपासून बनवलेल्या सेंद्रिय खतातील नत्र, स्फुरद आणि पालाशचे प्रमाण हे शेणखतापेक्षाही अधिक असते, असा प्रयोगांचा निष्कर्ष आहे..Poly Mulching Farming: पॉलिमल्चिंगची मागणी घटली.हवामान बदलावरील परिणामपऱ्हाटी जाळल्यामुळे निर्माण होणारा धूर हवेत मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड, नायट्रस ऑक्साइड, अमोनिया आणि अस्थिर सेंद्रिय संयुगे यांचे उत्सर्जन करतो. हे सर्व वायू हरितगृह वायू असून ते हवेचे प्रदूषण वाढवून जागतिक तापमान वाढीच्या समस्येस हातभार लावतात. ज्वलनामुळे शेतातील मातीचे तापमान कमालीचे वाढते, ज्यामुळे मातीतील उपयुक्त सूक्ष्मजीव मरतात. जमिनीची सेंद्रिय कर्ब पातळी कमी झाल्यामुळे पाण्याची जलधारण क्षमता घटते, ज्यामुळे विशेषतः अतिवृष्टीसारख्या हवामान बदलामुळे पिकांवर येणारा ताण माती लवकर शोषू शकत नाही..इन-सिटू पऱ्हाटी व्यवस्थापन तंत्रज्ञानपऱ्हाटी जाळण्यावर कॉटन श्रेडर हा एक प्रभावी आणि वैज्ञानिक उपाय आहे. या तंत्रज्ञानामुळे कापूस अवशेष शेतातून दूर न करता, त्यावर शेतातच खतामध्ये रूपांतर करण्यासाठी आवश्यक भौतिक प्रक्रिया पूर्ण करता येतात..Agriculture Mulching: शेतीमध्ये आच्छादनाचा वापर करुन थांबवा मातीची धूप.कॉटन श्रेडरची कार्यप्रणालीकापूस पऱ्हाटी श्रेडर, रोटाव्हेटर, किंवा अपरूटर हे ट्रॅक्टरवर चालणारे यंत्र आहे. हे यंत्र उभी पऱ्हाटी सूक्ष्म तुकड्यांमध्ये रूपांतरित करते आणि शेतात समानपणे पसरवते किंवा थेट जमिनीत मिसळते.या प्रक्रियेमुळे पऱ्हाटीतील सेल्युलोज आणि लिग्निनचे आवरण तुटते, ज्यामुळे अवशेष लवकर कुजतात आणि सेंद्रिय खतात रूपांतरित होतात. परिणामी, जमिनीची रचना सुधारते, पाणी धारण करण्याची क्षमता वाढते..या तंत्रज्ञानाच्या सातत्यपूर्ण वापराने जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण स्थिरपणे वाढते. पाच ते दहा वर्षांत सुमारे १० ते १५ टक्के, तर दीर्घकाळात ५० टक्क्यांपर्यंत सुधारणा दिसून येते. संशोधनानुसार, श्रेडरचा वापर केल्यास एका हेक्टरी कापूस उत्पादन सुमारे ६ टक्यांनी वाढले आहे.यांत्रिकी श्रेडर तंत्रज्ञानाचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे गुलाबी बोंड अळी नियंत्रण. पऱ्हाटी जाळण्याच्या तुलनेत या पद्धतीत ७६ टक्के अळी नष्ट होण्यास मदत होते. त्यामुळे किडीचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी होतो..Agriculture Mulching: शेतीसाठी सेंद्रिय आणि प्लॅस्टिक आच्छादन; कोणते ठरते सर्वात फायदेशीर?.कंपोस्ट प्रक्रियेस गतीशेतकरी पऱ्हाटी जाळतात, कारण पुढील पीक घेण्यासाठी त्यांना शेत तयार करणे गरजेचे असते. पारंपरिक कंपोस्टिंग प्रक्रियेस ३ ते ६ महिन्यांचा मोठा कालावधी लागतो, जो शेतकऱ्याच्या पीक फेरपालटीच्या नियोजनात मोठा अडथळा ठरतो.श्रेडरने भुगा केल्यानंतर, कंपोस्टिंगचा कालावधी कमी करण्यासाठी बायोकल्चर (उदा. डी-कंपोस्टर) वापरणे आवश्यक आहे. या जैविक संवर्धकांचा वापर केल्यास, पऱ्हाटीचा भुगा अत्यंत जलद गतीने कुजतो..शास्त्रीय अभ्यासानुसार, या पद्धतीचा वापर करून ओली पऱ्हाटी केवळ ४५ दिवसांत आणि कोरडी पऱ्हाटी ६० दिवसांत उच्च गुणवत्तेच्या सेंद्रिय खतात रूपांतरित होते. या जलद कंपोस्टिंगमुळे शेतकरी त्यांच्या रब्बी पिकांची पेरणी वेळेवर (उदा. हरभरा, ज्वारी) करू शकतो, ज्यामुळे वेळेचा अडथळा प्रभावीपणे दूर होतो.जमिनीत पऱ्हाटीचा भुसा मिसळल्याने उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश १५ ते ३० टक्यांनी वाढते. जैविक प्रक्रिया आणि सूक्ष्मजंतूंची संख्या अनेक पट वाढते. जमीन पाणी साठवते, जमिनीची धूप कमी होते..Plastic Mulching: दर्जेदार भाजीपाला मिळवण्यासाठी प्लॅस्टिक मल्चिंगची गुरुकिल्ली.शाश्वत शेतीसाठी फायदेपऱ्हाटीचा भुसा जमिनीत गाडल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब आणि इतर पोषणद्रव्ये हळूहळू उपलब्ध होतात. या अवशेषांचा जमिनीमध्ये समावेश केल्याने पुढील पिकाच्या उत्पादनात सरासरी १० टक्यांनी वाढ झाल्याचे आढळले आहे.पऱ्हाटीतील नत्र, स्फुरद आणि पालाश जमिनीला दीर्घकाळ पोषण पुरवतात. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील उच्च सामू असलेल्या जमिनीत पऱ्हाटीचा भुगा गाडल्याने सामू संतुलित होतो. सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. भुगा नैसर्गिक आच्छादनाप्रमाणे कार्य करून जमिनीचे तापमान नियंत्रित ठेवतो, पाणी धारण क्षमता वाढवतो. त्यामुळे अनियमित पावसाच्या काळातही पिकाला संरक्षण मिळते..महाराष्ट्र शासन कृषी यांत्रिकीकरण अनुदान योजनातून श्रेडर / अपरूटर, स्ट्रॉ मॅनेजमेंट यंत्रावर सुमारे ३५ ते ५० टक्के अनुदान देते. ही योजना कृषी विज्ञान केंद्र, शेतकरी उत्पादक कंपनी किंवा शेतकरी गटांसाठी फायदेशीर आहे. काही ठिकाणी कंपन्या किंवा उद्योग समूह शेतकऱ्यांकडून कापूस पऱ्हाटी खरेदी करून बायोचार, बायोमास पेलेट्स किंवा औद्योगिक इंधनासाठी वापर करतात..Mulching Farming : भाजीपाला पिकात प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर.पऱ्हाटी व्यवस्थापनाचे टिकाऊ पर्यायसेंद्रिय खतपऱ्हाटीचा भुगा शेणखतामध्ये मिसळून तयार केलेले मिश्रण जमिनीचे सेंद्रिय कर्ब वाढवते. दीर्घकालीन पोषण पुरवठा सुनिश्चित करते. शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्च न करता परंपरागत पद्धतीने उच्च गुणवत्तेचे खत मिळविता येते.गांडूळ खतगांडूळ खत निर्मितीमध्ये पऱ्हाटीचा भुगा वापरून उच्च पोषणमूल्य असलेल्या खतामध्ये रूपांतर करता येते. याचा जमीन सुपीकतेला फायदा होतो..बायोगॅस निर्मितीपऱ्हाटीचा भुगा आणि शेणखताचे मिश्रण बायोगॅस युनिट्समध्ये वापरून स्वच्छ ऊर्जा उत्पादन करता येते. तसेच स्लरीचा वापर सेंद्रिय खत म्हणून करता येतो.श्रेडर तंत्रज्ञानकॉटन श्रेडर, रोटाव्हेटर किंवा अपरूटर यंत्रांचा वापर करून पऱ्हाटीचे तुकडे करता येतात. याचे त्वरित विघटन होते. जमिनीचे सेंद्रिय कर्ब वाढतो. जमिनीची रचना व पाणी धारण क्षमता लक्षणीयरित्या सुधारते..जैविक खतबायोकल्चर वापरून पऱ्हाटीचा विघटन ४५ ते ६० दिवसांत पूर्ण होते. शेतकऱ्यांना रब्बी पिकांची वेळेवर पेरणी करता येते. पोषणद्रव्य १५ ते ३० टक्के अधिक मात्रामध्ये उपलब्ध होते. रासायनिक खतांवरील अवलंबित्व क्रमशः कमी होते.कांडी कोळसा/ब्रिकेट उत्पादनपऱ्हाटीचे कांडी कोळशात रूपांतर करून लोखंडी भट्टी, स्क्रू प्रेस आणि विशेष चुलीमध्ये वापर करता येतो. यातून रोजगार निर्मिती शक्य आहे..अळंबी उत्पादनपऱ्हाटीचा वापर अळंबी उत्पादनासाठी माध्यम म्हणून करता येतो.प्लायवुड निर्मितीपऱ्हाटीचा भुसा औद्योगिक वापरासाठी प्लायवुड आणि पार्टिकल बोर्ड तयार करण्यासाठी वापरला जाते.यातून दीर्घकालीन व्यावसायिक संधी निर्माण होते.वैभव सूर्यवंशी ९१९७३०६९६५५४, डॉ. सुयोग खोसे ९४०३६१३४७१(विषयतज्ञ, कृषी अभियांत्रिकी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव, जि.पुणे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.