Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार अनुदान

Crop Damage Compensation : रब्बी हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Team Agrowon

Amravati News : विधानसभेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत शेतकऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी रब्बी हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

या अनुदानात मे महिन्यातील बाधित शेतकऱ्यांचा समावेश नसून जानेवारी ते एप्रिल या कालावधीत अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रतीक्षेतील ७४ हजार ३९२ शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. त्यांच्यासाठी १६६ कोटी ६४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

जानेवारी ते मे या कालावधीत अवकाळी पावसाने शेतीपिकांचे जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. ४९ हजार ३६७ हेक्टर क्षेत्रातील पिकांची नासाडी होऊन शेतकऱ्यांच्या हातातील पीक गेले होते. जिल्हा प्रशासनाने या नुकसानीचा संयुक्त अहवाल विभागीय आयुक्तांमार्फत शासनाला पाठविला होता.

मात्र अनुदानाची घोषणा होत नसल्याने नवीन खरीप हंगाम सुरू झाला तरी शेतकरी अनुदानापासून वंचित होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त होता. दरम्यान मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी राज्यातील चार महसूल विभागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ५९६ कोटी २१ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात येत असल्याचे घोषित केल्याने हा प्रश्न मार्गी लागला आहे.

नाशिक, पुणे, अमरावती व नागपूर या चार महसूल विभागांसाठी ५९६ कोटी २१ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यासाठी १६७ कोटी ८३ लाख रुपयांचा समावेश आहे. तर, उर्वरित अकोला, यवतमाळ, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांसाठी ११४ कोटी २९ लाख रुपयांची तरतूद आहे.

मे मधील नुकसानीचा उल्लेख नाही

मे २०२४ मधे अवकाळी पावसाने जिल्ह्यातील मोर्शी, भातकुली, नांदगाव खंडेश्वर, चिखलदरा, अंजनगावसुर्जी व तिवसा या तालुक्यांत ३७१ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचा संयुक्त अहवाल पाठविण्यात आला असून १ कोटी १९ लाख रुपये अनुदानाची मागणी जिल्हा प्रशासनाने नोंदविली होती. तथापि जाहीर झालेल्या अनुदानात मे महिन्यातील नुकसानीचा उल्लेख नसल्याने ९३४ शेतकऱ्यांना प्रतीक्षा कायमच आहे.

Crop Damage Compensation

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT