ब्राझील, इस्राईलसारख्या देशांनी प्रक्रियेसाठी मोसंबीची खास वाणं विकसित करून शेतकऱ्यांना दिली आहेत. आपल्याकडे अशी वाण जोपर्यंत शेतकऱ्यांना मिळत नाहीत, तोपर्यंत मोसंबीच्या बागा तुटत राहणार!मराठवाड्याच्या मातीत केसर आंब्यापाठोपाठ रुजलेले मोसंबी हे अत्यंत महत्त्वाचे फळपीक!दुष्काळी पट्ट्यात हंगामी तसेच फळपिकांमध्ये सुद्धा फारसे पर्याय उपलब्ध नसताना मोसंबीने शेतकऱ्यांना चांगला आधार दिला आहे. मात्र मागील सुमारे दीड दशकापासून म्हणजे २०१२ च्या दुष्काळापासून या पिकाला लागलेली घरघर काही थांबताना दिसत नाही. .मोसंबीवर संकटे वाढत असताना संशोधन, शासन पातळीवर हे फळपीक तेवढेच दुर्लक्षित राहिले आहे. अनावृष्टी, अतिवृष्टी, अवेळी पाऊस यामुळे मोसंबी बहर नियोजनात अनंत अडचणींचा सामना उत्पादकांना करावा लागतो. एवढेच नव्हे तर या फळपिकावर कीड-रोगांचा प्रादुर्भावही सातत्याने वाढत आहे..Mosambi Crop Management : काटेकोर व्यवस्थापनातून मिळेल मोसंबी, संत्र्याचे दर्जेदार उत्पादन.मागील चार-पाच वर्षांपासून अनेक कारणांनी होणाऱ्या फळगळीने मोसंबी उत्पादक त्रस्त आहेत. बदलत्या हवामान काळात बहर व्यवस्थापन असो की कीड-रोग नियंत्रण उत्पादकांना शास्त्रशुद्ध माहिती मिळत नाही की शासनाच्या कोणत्या योजनेचा आधार नाही. त्यातच वाढता उत्पादन खर्च, घटत असलेले उत्पादन आणि कमी दर यामुळे मोसंबीची शेती उत्पादकांना तोट्याची ठरत आहे..त्यामुळे अनेक शेतकरी मोसंबीच्या बागा तोडून पर्यायी पिकांचा शोध घेत आहेत. मोसंबीचा होत चाललेला हा ‘मंद ऱ्हास’ दुर्दैवी म्हणावा लागेल. बदनापूर येथील मोसंबी संशोधन केंद्र असो की नागपूर येथील केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था असो त्यांचे काम रोप निर्मिती आणि शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन कोरडे मार्गदर्शन यापुढे जाताना दिसत नाही..Mosambi Fruit Drop : मोसंबी फळगळीची कारणे, अडचणी आणि उपाय यांचा अहवाल सादर करा.बदलत्या हवामानानुसार बहर व्यवस्थापनातील बदल, सिट्रस सायला या किडीसह मंद ऱ्हास ते मर अशा विविध रोगांच्या प्रभावी नियंत्रणाचे उपाय उत्पादकांना मिळत नाहीत. न्युसेलर, सातगुडी, फुले मोसंबी याशिवाय लागवडीसाठी फारशा जातींचे पर्याय शेतकऱ्यांकडे उपलब्ध नाहीत. लागवडीच्या काळात दर्जेदार कलमांची वानवा असते..संशोधन संस्थांनी या सर्व बाबी गांभीर्याने घेऊन नव्या जाती, गुणवत्तापूर्ण कलमे उपलब्ध करून देण्याबरोबर उत्पादकांना बहर आणि कीड-रोग व्यवस्थापनात संशोधनात्मक प्रभावी मार्गदर्शन करायला हवे. दोन वर्षांपूर्वी दिल्ली येथील ‘एनबीपीजीआर’ या संस्थेने बदनापूर येथील संशोधन केंद्रातून मोसंबीच्या काही जाती आणि खुंट संशोधनासाठी नेले होते. त्याचे पुढे काय झाले, हेही स्पष्ट व्हायला हवे..Mosambi Farming: मोसंबी फळांचा आकार, दर्जा राखण्यावर भर.शिवाय चार सिट्र्स इस्टेटच्या निधी मंजुरीसह घोषणा सुमारे तीन वर्षांपूर्वी झाल्या, त्यातील एक सिट्रस इस्टेट मोसंबीवर काम करण्यासाठी संभाजी नगर येथे होणार आहे. यांचे प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार, हेही उत्पादकांना कळायला हवे. काढणीपश्चात सेवा सुविधा, विक्री, प्रक्रिया यामध्ये देखील मोसंबी हे फळपीक फारच मागे आहे. मूल्यसाखळीतील पायाभूत सुविधांच्या उभारणीतून शेतीमाल स्थानिक ते जागतिक बाजारपेठेत पोहोचला पाहिजे, अशा व्यापक हेतूने मॅग्नेट प्रकल्प राज्यात राबविण्यात येत आहे..यात मोसंबीचा देखील समावेश असताना यातूनही फारसे काही साध्य झाले नाही. आपल्याकडील मोसंबी वाणांचा रस काढल्याबरोबर लगेच प्यावा लागतो, नाही तर कडवट होऊन खराब होतो. त्यामुळे मोसंबीचे फळ ताजे खाण्यापासून ते गाड्यावर काढून मिळणाऱ्या रसापलीकडे कधी गेले नाही..मोसंबीपासून जॅम, जेली, स्क्वॅश, मार्मालेड असे अनेक प्रक्रियायुक्त पदार्थ बनविता येतात. परंतु मोसंबीचे फारसे मूल्यवर्धन होत नसल्याने हे पदार्थ बाजारात दिसत नाहीत. ब्राझील, इस्राईलसारखे देश प्रक्रियेसाठी मोसंबीची खास वाण विकसित करून शेतकऱ्यांना देतात. आपल्याकडील शेतकऱ्यांना अशी वाणं जोपर्यंत मिळत नाहीत, तोपर्यंत मोसंबीच्या बागा तुटत राहणार, हे लक्षात घ्यायला हवे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.