Crop Damage : दीड लाख हेक्टर पिकांना फटका

Rain Crop Damage : मॉन्सूनच्या सुरू असलेल्या जोरदार घोडदौडीमुळे राज्यात आतापर्यंत ३१४ तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Pune News : मॉन्सूनच्या सुरू असलेल्या जोरदार घोडदौडीमुळे राज्यात आतापर्यंत ३१४ तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. दरम्यान, पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचे क्षेत्र आता १.३८ लाख हेक्टरच्या पुढे गेले आहे.

सुमारे दीड लाख हेक्टरहून अधिक पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे प्रशासनाकडून सुरू आहे. यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

पीक नुकसानीच्या ताज्या अहवालानुसार, पावसाचा फटका बसल्यामुळे पिकांची नासाडी झालेल्या जिल्ह्यांची संख्या आता २५ पर्यंत आली आहे. पंधरवड्यापूर्वी राज्यातील भात उत्पादक शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत होते.

Crop Damage
Crop Damage : राज्यात ६८ हजार हेक्टर पिके नष्ट; पंचनामे सुरू

आता काही भात उत्पादक तालुक्यांमध्ये अतिपाऊस होत असून, उघडीप व्हावी, अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. सिंधुदुर्गमधील सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ, वैभववाडी, देवगड, मालवण, कणकवली, वेंगुर्ला तालुक्यांतील १४४० हेक्टरवरील भात पीक नष्ट झाले आहे.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, अतिवृष्टीत रायगडमधील तीन हजार हेक्टरवरील भातशेती वाहून गेली आहे. यात अलिबाग, मुरुड, महाड, श्रीवर्धन, पेण, खालापूर, रोहा, पोलादपूर, सुधागड, तळा, माणगाव, उरण, कर्जत भागांतील भातखाचरांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यात देखील २३१ हेक्टरवरील भाताचे नुकसान झाले आहे.

सांगली भागात अतिपाऊस, पूर परिस्थितीमुळे साडेआठ हजार हेक्टरवरील भात, ऊस, सोयाबीन, नाचणी, भुईमूग आणि भाजीपाला शेतीचे नुकसान झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतीच्या नुकसानीचा आकडा आता २७ हजार हेक्टरच्या आसपास पोहोचला आहे.

Crop Damage
Crop Damage : संततधार पावसाने कोवळी पिके धोक्यात

यंदा सरासरीपेक्षा जास्त पेऱ्याचा अंदाज

राज्यात गेल्या ५७ दिवसांमध्ये पडलेला एकूण पावसाचा आकडा आता ६८६ मिलिमीटरपर्यंत गेला आहे. पूर्ण पावसाळ्यात राज्यात सरासरी एकूण पाऊस १०७५ मिलिमीटर होतो. त्यापैकी यंदा आतापर्यंत ६४ टक्के पाऊस झालेला आहे. विशेष म्हणजे जुलैत ३० दिवस सतत पाऊस पडला आहे.

जुलैत पडणाऱ्या एकूण पावसाच्या तुलनेत १४१ टक्के पाऊस गेल्या तीन दिवसांत पडला आहे. दमदार पावसामुळे एकूण खरीप पेरा आता १३४ लाख हेक्टरच्या पुढे गेला आहे. राज्याचे सरासरी खरीप क्षेत्र १४२ लाख हेक्टर आहे. मात्र, यंदा सरासरीपेक्षा जास्त पेरा होण्याचा अंदाज आहे.

१०३ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

राज्यात दीड कोटींहून अधिक शेतकऱ्यांनी पिकाचा विमा उतरवला आहे. २९ जुलैअखेर विमाधारकांची संख्या १५५ लाखांच्या पुढे गेली होती. यामुळे एकूण १०३ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र विमा संरक्षित झालेले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com