Buldana News: चिखली विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केलेले, माजी मंत्री भारतभाऊ बोंद्रे (वय ८४) यांचे बुधवारी (ता. ३) वृद्धापकाळाने निधन झाले. जिल्ह्यातील जलसंपदा विकास, प्रादेशिक पाणी व्यवस्थापन आणि स्थानिक प्रकल्प उभारणीमध्ये मोठा वाटा उचललेल्या या अभ्यासू नेतृत्वाच्या निधनाने बुलडाणा जिल्हा हळहळला आहे. त्यांच्या पश्चात सात भाऊ, तीन बहिणी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे..श्री. बोंद्रे यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत मंत्रिमंडळात पाटबंधारे खात्याचे राज्यमंत्री तसेच शिक्षण आणि उद्योगमंत्री म्हणून प्रभावी कामगिरी बजावली. जिल्ह्यातील सिंचन क्षमतेत भरीव वाढ करण्याचा ध्यास त्यांनी कायम घेतला होता. पेनटाकळी, खडकपूर्णा, जिगाव, शिवणी अरमाळ, काटोदा अशा अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांसाठी त्यांनी पुढाकार घेतला..Satyapal Malik Death: सत्यपाल मलिक यांचे निधन .त्यांच्या अथक पाठपुराव्यामुळे पेनटाकळी आणि खडकपूर्णा हे दोन निर्णायक जलसिंचन प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकले. या प्रकल्पांमुळे बुलडाणा जिल्ह्याला दीर्घकाळ भेडसावत असलेल्या पाणीटंचाईतून मोठा दिलासा मिळाला आणि हजारो शेतकऱ्यांच्या शेतीला नवसंजीवनी मिळाली. आज या प्रकल्पांमुळे हंगामी सिंचन क्षेत्रात मोठी वाढ झाली..Ravi Naik Passed Away: गोव्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान कृषिमंत्री रवी नाईक यांचे निधन .पिण्यासाठी पाणी उपलब्ध झाले. स्थानिक विकासावर केंद्रित असलेल्या त्यांच्या दृष्टिकोनातून चिखली येथील एमआयडीसी ग्रोथ सेंटरची उभारणी केली. उद्योग वाढीसाठीही त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. सर्वांगीण विकासाचा ध्यास त्यांनी घेतला होता..अभ्यासपूर्ण, तर्कशुद्ध विचार, संयमी आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते निष्ठावान समर्थक म्हणूनही राजकीय क्षेत्रात परिचित होते. बुलडाणा जिल्ह्यातील जलसंपदा निर्मिती, पाणी व्यवस्थापन आणि लोकसेवा क्षेत्रात त्यांनी मोठे कार्य उभे केले होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.