Crop Damage Compensation : अवकाळी पावसाच्या मदतीपोटी ५९६ कोटी

Heavy Rain : जानेवारी ते मे अखेर झालेल्या अवेळी पावसाच्या नुकसानीपोटी ५९६ कोटी ९६ हजार रुपये वितरणास मान्यता देण्यात आली आहे.
Crop Damage
Crop Damage Agrowon
Published on
Updated on

Mumbai News : जानेवारी ते मे अखेर झालेल्या अवेळी पावसाच्या नुकसानीपोटी ५९६ कोटी ९६ हजार रुपये वितरणास मान्यता देण्यात आली आहे. नाशिक, अमरावती आणि नागपूर विभागांत सर्वाधिक नुकसान झाले असून २ लाख १७ हार ६९० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे प्रस्ताव शासनात प्राप्त झाले होते.

जानेवारी ते मे अखेर वेळोवेळी अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले होते. या नुकसानीचे पंचनामे करून वेळोवेळी विभागीय आयुक्तांकरवी प्रस्ताव सादर करण्यात आले होते. नाशिक विभागात १०८ कोटी २१ लाख २० हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे.

Crop Damage
Crop Damage : संततधार पावसाने कोवळी पिके धोक्यात

पुणे विभागात ५८ कोटी ३ लाख, ९९ हजार, अमरावती विभागात सर्वाधिक ३८२ कोटी १२ लाख ४१ हजार तर नागपूर विभागात १०० कोटी ४ लाख ९५ हजार रुपयांची मदत वितरित करण्यास मान्यता दिली आहे. ही मदत डीबीटी पोर्टलद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. ही मदत २ ते ३ हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार आहे.

अवकाळी पावसामुळे राज्यात रब्बी पिकांबरोबरच उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. द्राक्षे, संत्री, भाजीपाला, कांदा आदी पिके वाया गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. याआधी जानेवारी महिन्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी २२५३ कोयी २२ लाख रुपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली होती.

Crop Damage
Crop Damage : दीड लाख हेक्टर पिकांना फटका

ही मदत नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांत झालेल्या नुकसानीपोटी देण्यात आली होती. मात्र, जानेवारीपासून उन्हाळ्यात अवेळी पाऊस झाल्याने ठिकठिकाणी नुकसान झाले होते. त्यांचे ११ प्रस्ताव राज्य सरकारला प्राप्त झाले होते. राज्य आपत्ती निवारण निधीतून देण्याचा निर्णय घेण्यात आला.

मदतीचा तपशील (आकडे लाखांत)

विभाग---नुकसान क्षेत्र---मदत

नाशिक---३७४२२.६७---१०८२१. २०

पुणे---१६५९.२१---५८३.९९

अमरावती---१३८२५३.९३---३८२१२.४१

नागपूर---४०३५६.७९---१००४.३५

एकूण---२१७६९०.६०---५९६२१.५१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com